भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आता उद्धव ठाकरे यांचे निकटवर्ती आमदार रवींद्र वायकर यांच्या विरोधात आझाद नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यामुळे वायकर यांच्या समोर अडचणी निर्माण झाली आहे.
Today 4pm I will file complaint at Azad Maidan Police Station against #RavindraWaikar for
₹500 crores 5 Star Hotel Ghotalaआज दुपारी 4 वाजता मी आझाद मैदान पोलीस ठाण्यात श्री रवींद्र वायकर
यांचा ₹500 कोटी 5 स्टार हॉटेल, घोटाळा विरोधात तक्रार दाखल करणार आहे@BJP4Maharashtra— Kirit Somaiya (@KiritSomaiya) March 11, 2023
अलिबागला १९ बंगले घोटाळा करणारे उद्धव ठाकरे यांचे निकटवर्ती रवींद्र वायकर यांनी नवीन घोटाळा केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. जोगेश्वर विक्रोळी लिंक रोडवरील २ लाख स्वे. फुट असलेले मुंबई महापालिकेच्या मालकीचे लहान मुलांचे मैदान उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना आणि मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या कृपेने रविंद्र वायकरांनी गिळंकृत केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी त्यांच्या तक्रारीत केला आहे. जोगेश्वर विक्रोळी लिंक रोड येथील कमाल अमरोली स्टुडिओची जागा अविनाश भोसले शहीद बलवा कंपनीने रवींद्र वायकरांसोबत मिळून २००९ मध्ये या जागेचा आरजी फ्लॉट विकत घेतला. या फ्लॉटमधील ३३ टक्के जागेवर स्पोर्टस ट्रेनिंग सेंटर बनवायच्या नावाखाली भव्य फाईव्हस्टार क्लब बनवून वायकरांनी ते पैसे बँकेकडून वसूल केले आणि २ तुतीयांश जागा ही खुल्या मैदानासाठी पालिकेच्या ताब्यात देण्याची कागदावर प्रक्रिया करण्यात आली.