भाजपन नेते किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांच्या अटकेनंतर प्रतिक्रिया दिली आहे. राऊत यांना आता नवाब मलिकांशेजारीच रहावे लागणार आहे. ईडीकडून त्यांची दुबईच्या ट्रीपचीही चौकशी करण्याची मागणी सोमय्यांनी केली आहे. दुबईच्या या ट्रीपमध्ये संजय राऊत यांना कोण भेटले? काय व्यवहार झाले? त्याचीही चौकशी केली गेली तर 1 हजार 34 कोटींच्या पत्राचाळ घोटाळा प्रकरणी आणखी काही माहिती बाहेर पडू शकेल, असे सोमय्या यावेळी म्हणाले. तसेच, सोमय्या राऊतांवर टीका करताना म्हणाले की, याप्रकरणी त्यांच्यावर कडक कारवाई होणार असून, त्यांना आता ईडी म्हणजे काय याचा अर्थ कळेल, असेही सांगितले.
राऊतांची सूटका होणे अवघड
उद्धव ठाकरे पक्षप्रमुख असलेल्या शिवसेनेची महाराष्ट्रात दयनीय अवस्था आहे. हे अवघ्या महाराष्ट्राला माहित आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री, असे राज्यात मजबूत सरकार आहे. तसेच, संजय राऊत यांच्यावर 3 क्रिमिनल केसेस आहेत. त्यातून त्यांची सुटका होणे अवघड असल्याचे, किरीट सोमय्या यावेळी म्हणाले.
( हेही वाचा: “राऊतांच्या घरात शिंदेंच्या नावाने सापडलेले ते 10 लाख म्हणजे”…केसरकरांची धक्कादायक प्रतिक्रिया )
आता परबांची बारी
संजय राऊत यांना ईडीकडून अटक झाल्यानंतर, रवी राणा यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. गेल्या वर्षभरापासून ईडी निष्पक्षपणे चौकशी करत आहे. अनेकदा संजय राऊत यांना जबाब नोंदवण्यासाठी बोलवण्यात आले. पण राऊतांनी टाळाटाळ केली. संजय राऊत यांनी आर्थिक अफरातफर केली आहे. त्याचे धागेदोरे लांबपर्यंत जात आहेत. ते अनिल परबांपर्यंत पोहोचतील आणि त्यांना सुद्धा जेलमध्ये जावे लागेल, असे रवी राणा म्हणाले.
Join Our WhatsApp Community