महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ऑल इंडिया उलेमा बोर्डाने महाविकास आघाडीला पाठिंबा जाहीर केला. त्यानंतर भाजपाने विरोधकांवर व्होट जिहादचा आरोप केला. दरम्यान भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (श.प) चे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
( हेही वाचा : ‘मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही…’,Eknath Shinde यांचं मोठं वक्तव्य; राहुल गांधींना दिलं आव्हान)
सोमय्या (Kirit Somaiya) म्हणाले की, शरद पवार (Sharad Pawar) यांना हिंदूंबद्दल (Hindu) बोलण्याची लाज वाटते की भीती? भाजपाला मतदान करणाऱ्यांवर सामाजिक बहिष्कार टाकण्याची भाषा मौलाना सज्जाद नोमानी यांच्यासारखे लोक करतात. मात्र शरद पवार यांनी (Sharad Pawar) उलेमा बोर्ड आणि मराठी मुस्लिम सेवा संघाला पाठिंबा देतात. इतकचं काय उलेमा बोर्डाने केलेल्या मागण्या शरद पवार (Sharad Pawar) आणि मविआने मान्य केल्या आहेत. त्यामुळे शरद पवार (Sharad Pawar) आणि राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या कुटुंबियाने व्होट जिहादसारख्या गोष्टी पसरवल्या, त्यांना लाज वाटली पाहिजे, अशी घणाघाती टीका सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केली.
हेही पाहा :