लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात मुस्लिम बहुल भागात एक गठ्ठा मते भाजपाच्या विरोधात पडली, त्यामुळे भाजपाचे उमेदवार पडले, हा Vote Jihad होता, असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत आहेत. यावर राज्याचे मुख्य निवडणूक आयोगाचे अधिकारी चोकलिंगम यांना पत्रकारांनी, हा शब्द आचारसंहितेचा भंग करणारा आहे का? आता भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनीच लोकसभेतील मतदानाची आकडेवारी Vote Jihad सिद्ध केला.
निवडणूक आयोगाने सांगितले
मुंबईत गेल्या पाच वर्षात 5% मतदार वाढले. त्यात मालाड मालवणी येथे 22.34% आणि चांदिवली येथे 20.47% मतदार वाढले, हे कुठून आले?
लोकसभा निवडणुकीत मालेगाव विधानसभेत 178 बूथमध्ये कॉंग्रेसला 99,053 मते मिळाली, भाजपला फक्त 596 मते मिळाली
याला काय म्हणायचं? pic.twitter.com/F6zinCsCqx
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) October 17, 2024
भाजपाकडून Vote Jihad शब्दाचा वापर होत असल्यामुळे यासंदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली आहे. आयोगाने चौकशी करून कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. त्यावर आता भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी आकडेवारी देत सवाल उपस्थित केला. किरीट सोमय्यांनी काही मतदारसंघातील आकडेवारी पोस्ट केली आहे. त्या आकडेवारीवर बोट ठेवत किरीट सोमय्यांनी हे कुठून आले? असा सवाल केला आहे. निवडणूक आयोगाने सांगितले मुंबईत गेल्या पाच वर्षात 5% मतदार वाढले. त्यात मालाड मालवणी येथे 22.34% आणि चांदिवली येथे 20.47% मतदार वाढले, हे कुठून आले? लोकसभा निवडणुकीत मालेगाव विधानसभेत 178 बूथमध्ये काँग्रेसला 99,053 मते मिळाली, भाजपाला फक्त 596 मते मिळाली, याला काय म्हणायचं?, असा सवाल किरीट सोमय्यांनी Vote Jihad च्या मुद्द्यावर बोलताना केला आहे.
(हेही वाचा निज्जर हत्येप्रकरणी Canada चा खोटारडेपणा उघड; संबंध बिघडण्यास ट्रूडोच जबाबदार असल्याचा भारताचा आरोप)
निवडणूक आयोगाने काय म्हटले?
पत्रकार परिषदेत बोलताना आयोगाचे अधिकारी कुलकर्णी म्हणाले, आपल्याकडे अभिव्यक्ती आणि भाषण स्वातंत्र्य आहे. कोणी आपले मते मांडणे, वैयक्तिक किंवा जाहीरपणे या सगळ्याबद्दल आपला कायद्यात काही ना काही म्हटलेलं आहे. कायद्याच्या बाहेर जाणारे विधान कुणी करत असेल, तर त्याच्यावर निश्चित कारवाई होईल. आपण जो प्रश्न विचारला की अमूक हे (व्होट जिहाद शब्द) कायद्याच्या बाहेर जाणार आहे की नाही. याचं उत्तर नक्की काय झालेलं आहे? पुरावे काय आहेत? याच्यावर अवलंबून आहे. आणि कायद्याच्या चौकटीतच हे सिद्ध व्हावे लागते, असे आयोगाचे अधिकारी म्हणाले आहेत.
Join Our WhatsApp Community