काय म्हटले सोमय्यांनी ट्विटमध्ये?
Mumbai Police Circulated a
*FAKE FIR ” of Mine about 23 April AssaultI have not filed any FIR. Bandra Police Station refused to register My FIR on 23 April
I will file complaint tomorrow 12 noon at Khar Police Station against this Criminal Conspiracy of Bogus Manipulated FIR
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) April 25, 2022
महाराष्ट्रात शनिवारी, 23 एप्रिल रोजी हनुमान चालिसा पठणावरुन हाय होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. मुंबई पोलिसांनी राणा दाम्पत्याला अटक केली. या अटकेनंतर त्यांना तुरुंगात भेटण्यासाठी भाजप नेते किरीट सोमय्या गेले आणि त्यांच्या गाडीवर जमावाकडून हल्ला करण्यात आला. या जमावाने केलेल्या हल्ल्यानंतर महाराष्ट्र सरकारवर गंभीर आरोप करत, किरीट सोमय्या यांनी दिल्लीत गृहसचिवांनी भेटणार असल्याचे सांगितले. त्याप्रमाणे त्यांनी सोमवारी गृहसचिवांची भेट घेतली. 20 मिनिटे झालेल्या भेटीनंतर किरीट सोमय्या यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. किरीट सोमय्यांसह राज्यातील इतर व्यक्तींवर झालेले हल्ले हे चिंताजनक असून महाराष्ट्रातील परिस्थितीचा अभ्यास करुन गरज पडली तर केंद्रीय गृहखात्याची टीम महाराष्ट्रात पाठवू, असे आश्वासन केंद्र सरकारचे गृहसचिव अजय भल्ला यांनी दिल्याचे किरीट सोमय्यांनी म्हटले आहे. यानंतर काही तासांतच पोलिसांनी माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्यासह तीन माजी नगरसेवकांना अटक केली आणि त्यानंतर जामीन देण्यात आला.