…आणि सोमय्यांनी पोलीस ठाण्याच्या पायऱ्यांवर ठिय्या मारला

95

दापोली पोलिसांकडून एफआयआर दाखल करून घेण्यात येत असल्याने अखेर भाजप नेते किरीट सोमय्यांनी पोलिस ठाण्याच्या पायऱ्यांवरच मौनव्रत धारण करत ठिय्या मारला. पोलिस ठाण्यापासून ५०० मीटरच्या अंतरावर थांबवल्याने, आधी ही सर्व वाहने परत पोलिस ठाण्याच्या हद्दीत आणा त्यांनतर आपण आंदोलन मागे घेऊ असा इशाराही सोमय्यांनी देत आपल्याला मारण्यासाठी घातपात घडवून आणण्याचाच प्रयत्न केल्याचा आरोप केला. जिल्हा पोलिस अधिक्षकांनी घातपाताची भीती लेखी स्वरुपात आपल्याला दिल्याचेही सोमय्यांनी म्हटले आहे.

( हेही वाचा : ‘ते’ रिसॉर्ट माझे नाहीच – अनिल परब )

पोलिस जिल्हा अधिक्षकांकडून कोणतेही सहकार्य मिळत नाही 

दापोली पोलिस ठाण्यात साई रिसॉर्टवर कारवाई करण्यासंदर्भात जाणीव करून देण्यासाठी किरीट सोमय्या हे भाजप नेते व माजी खासगी नितेश राणे यांच्यासमवेत गेले होते. त्यानंतर पोलिसांसोबत बैठक झाल्यानंतर बाहेर पडल्यानंतर किरीट सोमय्यांनी ठिय्या मारला. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलतांना निलेश राणे यांनी आपल्याला पोलिस जिल्हा अधिक्षकांकडून कोणतेही सहकार्य मिळत नसल्याचा आरोप केला. ते वारंवार कुणाशी तरी बोलत असून दर पाच मिनिटांनी त्यांची भूमिका बदलत आहेत. सामान्य माणसालाही एफआयआर दाखल करण्याचा अधिकार आहे, मग आपला एफआयआर का घेतला जात नाही. एवढा पोलिसांवर दबाव. केवळ आम्हाला त्याठिकाणी बसून ठेवण्यात आले होते. त्यामुळे पोलिस दडपणाखाली असून आम्ही कोणत्याही परिस्थितीत साई रिसार्टच्या दिशेने जाणार असल्याचे सांगितले. दोन माजी खासदार उपस्थित असतानाही पोलिस जिल्हा अधिक्षक हे भेटायला बाहेर येत नाही याबाबतही त्यांनी नाराजी व्यक्त केली.

( हेही वाचा : सोमय्यांनी आता मुख्यमंत्र्यांनाही दिले हे आव्हान )

पोलिस ठाण्याच्या पायऱ्यांवर ठिय्या

त्यानंतर किरीट सोमय्यांनी पोलिसांकडून मिळत असलेल्या असहकार्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त करत मौनव्रत धारण करत पोलिस ठाण्याच्या पायऱ्यांवर ठिय्या मारला. जोवर न्याय मिळत नाही,तोवर हे आंदोलन मागे घेतले जाणार नाही. आमच्या गाड्या ५०० मीटर लांब पाठवण्यात आले असून कार्यकर्त्यांना लांब पाठवले आहे. त्यामुळे त्यांचेही अपहरण होण्याची भीती किरीट सोमय्यांनी वर्तवली आहे. जोवर वाहने आणि समर्थक कार्यकर्ते येत नाही, तोवर आम्ही पोलिस ठाण्यातून बाहेर जाणार नाही,असे सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.