शिवसेनेचे उपनेते आणि मुंबई महानगरपालिकेतील स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या संपत्तीवर प्राप्तीकर विभागाने आणखी 41 संपत्ती जप्त केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती आरोप केले आहेत. ‘हा 1 हजार कोटी रुपयांचा घोटाळा आहे. यशवंत जाधव यांनी म्हटले आहे की माझ्याकडे तर फक्त 10 टक्केच पैसे येत होते. मग उरलेले 90 टक्के रक्कम कुठे गेली? ती वांद्र्याच्या साहेबांकडेच गेली आहे,’ असा आरोप सोमय्या यांनी केला आहे.
थेट मुख्यमंत्र्यांना आव्हान
किरीट सोमय्या पुढे म्हणाले की, जेवढे घोटाळेबाज सापडत आहेत त्या सगळ्यांचा बॉस वांद्र्यात राहतो. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी माझ्याविरूद्ध कितीही खोटे गुन्हे दाखल केले तरी मी शांत राहणार नाही,’ अशा शब्दांत किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्र्यांना आव्हान दिले आहे.
( हेही वाचा: चाईल्ड पोर्नोग्राफी करणा-या तरुणाचा पोलिसांनी असा लावला छडा! )
पुन्हा लगावला राऊतांना टोला
गेल्या काही दिवसांत संजय राऊत आणि किरीट सोमय्या यांच्यात आरोप प्रत्यारोपांची राळ उठत आहे. ईडीने काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांची मालमत्ताही जप्त केली आहे. संपत्तीवर टाच आणली गेल्यामुळे शिवसेना नेते संजय राऊत यांना मुंबईत शक्तीप्रदर्शन करावे लागले. राऊत यांना आता दिवसाही भूत दिसायला लागले आहे, असा टोला सोमय्या यांनी लगावला आहे.
Join Our WhatsApp Community