यशवंत जाधवांसाठी ऑगस्टमध्येच लावलेली ‘फिल्डींग’! कोण होते यामागे?

122

मुंबई महानगर पालिकेतील शिवसेनेचे नेते आणि स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरी 25 फेब्रुवारीला आयकर विभागाकडून धाड टाकण्यात आली होती. आयकर विभागाची छापेमारी अद्यापही संपलेली नाही, सलग चौथ्या दिवशीही आयकर विभागाचं पथक यशवंत जाधवांच्या घरी झाडाझडती घेत आहे. आता अशातच भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी ट्वीट करत यशवंत जाधवांच्या घोटाळ्याबाबत 18 ऑगस्ट 2021 ला आयकर विभागाकडे तक्रार दाखल केल्याचे सांगितले आहे. त्यामुळे जाधवांसाठी ऑगस्ट महिन्यापासूनच फिल्डींग लावण्यात आल्याचे समोर आले आहे.

काय म्हटले आहे त्या ट्वीटमध्ये?

किरीट सोमय्यांनी  आयकर विभागाला लिहिलेले पत्र ट्वीट करत, शिवसेना यशवंत जाधव घोटाळा. आम्ही 18 ऑगस्ट 2021 रोजी आयकर, ED कडे तक्रार दाखल केली होती, असं सांगितलं आहे. या पत्रात आमदार यामिनी जाधव तसेच, यशवंत जाधव आणि त्यांच्या कुटुंबांने मनी लाॅंडरिंग केल्याचे आरोप करण्यात आले आहेत.

( हेही वाचा: देवनार वसाहतीची जागा कुणाची? पुनर्विकासासाठी जागेचे सिमांकन! )

अद्यापही झाडाझडती सुरुच

यशवंत जाधवांच्या 33 ठिकाणी आतापर्यंत झालेल्या झाडाझडतीत 10 बॅंक खात्यांवर निर्बंध आणत यातील व्यवहाराचा लेखाजोखा तपासण्यात येत आहे. जाधवांच्या गोरेगाव येथील बांधकाम व्यवसायिक बिमल अग्रवाल, पाच सिव्हिल कंत्राटदार यांच्यातील व्यवहाराची आयकर विभागाकडून तपासणी सुरु आहे. 25 फेब्रुवारीला सुरु झालेली ही झाडाझडती चौथ्या दिवशीही सुरु आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.