मुश्रीफांच्या विरोधात सोमय्या ‘या’ घोटाळ्याची करणार तक्रार!

किरीट सोमय्या यांनी याआधी हसन मुश्रीफ यांनी केलेल्या घोटाळ्यांचे तब्बल २७०० पानी पुरावेच आयकर विभागाकडे सादर केले होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात भाजप नेते किरीट सोमय्या पुन्हा आक्रमक झाले आहेत. सोमय्या बुधवारी, १३ ऑक्टोबर रोजी मुश्रीफांच्या ग्राम पंचायत घोटाळ्याच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करणार आहेत.

१५०० कोटींचा घोटाळा

ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी ग्राम पंचायत कंत्राटी घोटाळा केला असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. हा घोटाळा १५०० कोटी रुपयांचा आहे. आता या घोटाळ्याची चौकशी करण्यात यावी, या मागणीसाठी किरीट सोमय्या आक्रमक बनले आहेत. ते यासाठी दुपारी १ वाजता पुण्यातील लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पोलिस अधीक्षक कार्यालयात मुश्रीफांच्या विरोधात तक्रार करणार आहेत. त्यामुळे मुश्रीफांच्या अडचणीत वाढ होणार आहे.

(हेही वाचा : निवडणुका नसल्याने सर्जिकल स्ट्राईकचे साहसी खेळ बंद!)

आयकर विभागात आधीच केली तक्रार

दरम्यान किरीट सोमय्या यांनी याआधी हसन मुश्रीफ यांनी केलेल्या घोटाळ्यांचे तब्बल २७०० पानी पुरावेच आयकर विभागाकडे सादर केले होते. हसन मुश्रीफ आणि त्यांच्या पूर्ण कुटुंबाच्या नावे हे पुरावे असल्याचे सोमय्या म्हणाले होते. यामध्ये २ साखर कारखान्यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे आहेत. त्यामध्ये मुश्रीफांच्या जावयाचाही संबंध आहे. मात्र मुश्रीफांच्या ही सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here