महापौर-परिवहनमंत्र्यांविरोधात तक्रार

152

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर आणि मंत्री अनिल परब यांच्या भ्रष्ट कारभाराविरोधात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी निर्मल नगर पोलीस स्टेशन, वांद्रे पूर्व इथे तक्रार दाखल केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ठाकरे सरकारमधील मंत्री अनिल परब आणि महापौर किशोरी पेडणेकर यांनी केलेल्या अनधिकृत बांधकाम / कब्जा अजूनपर्यंत काढण्यात अथवा हटवण्यात आलेला नाही. ठाकरे सरकारच्या दबावामुळे प्रशासन कारवाई करण्यास दिरंगाई करत असून आयपीसी सेक्शन 420, 468, 467, 471 अंतर्गत कारवाई मागणी सोमय्या यांनी केली आहे.

महापौर किशोरी पेडणेकर यांनी किश कॉर्पोरेट सर्विसेस इंडिया प्रा. लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून झोपडपट्टीवासियांचे गाळे लाटून भ्रष्ट कारभार केला आहे. महापौरांनी खोटी आणि बनावट कागदपत्र तयार करुन गोमाता जनता एसआरए मधील जागा बळकवली असून, रजिस्ट्रार ऑफ कंपनीकडे महापौर महोदया/परिवारांनी बनावट  करून खोटे डिक्लरेशन केले आहे.

महापौरांचा भ्रष्ट कारभार आणि आरोप

  •  महापौर किशोरी पेडणेकर, त्यांचा परिवाराने किश कॉर्पोरेट सर्विसेस इंडिया प्रा. लि. च्य माध्यमातून बेनामी, भ्रष्ट कारभार करत, खोटे बनवाट कागदपत्रांद्वारा गोमाता जनता एस.आर.ए. मधील अर्धा डझन गाळे हडप केले आहेत.
  • गोमाता जनता एसआरए सोसायटी, जी. के. कदम मार्ग, वरळी बिल्डींग क्र.1 तळ मजल्याचा वापर गेली अनेक वर्षे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर या अनधिकृतरित्या करत आहेत. बनावट कागदपत्र देऊन गैरकायदेशीररित्या व्यवसायिक कार्यालय सुरु केले आहे व गैरकायदेशीररित्या एसआरएच्या वास्तूचा कब्जा करून गेली अनेक वर्षे त्याचा वापर केला. झोपडपट्टीवासियांना/लाभार्थींना सदनिका देण्यात आल्या आहेत, त्या भाड्याने वापरता येत नाही, तसा करारही करता येत नाही. महापौरांनी स्वत: असे गैरकायदेशीर कृत्य केले आहे. बिल्डींग क्र. 1, तळ मजला येथे रहिवासी उपयोगाचे प्रमाणपत्र/permission होती/आहे. त्यावर ह्या सदनिका लाभार्थींना देण्यात आल्या, त्यात कुठेही मुंबईचे महापौर किशोरीताई पेडणेकर किंवा त्यांच्या परिवाराचे नाव नाही.
  •  सदनिका धारकाच्या खोट्या सह्यांद्वारा बोगस करार व बनावट कृत्याने आर्थिक व जागेचे व्यवहार करण्यात आले आहेत.
  • रजिस्ट्रार ऑफ कंपनी भारत सरकार येथे महापौर महोदया/परिवारांनी बनावट (forgery) करून खोटे डिक्लरेशन केले आहे, कंपनीचे रजिस्ट्रेशन प्राप्त केले आहे.
  • एसआरएनी (Change of user) यांना व्यवसायिक वापरासाठीची कोणतीही परवानगी दिलेली नाही. या रहिवासी राखीव जागेचा व्यवसायिक उपयोग करण्यात येत आहे.

मंत्री अनिल परब यांच्यावरील आरोप

मातोश्रीपासून अवघ्या अर्ध्या कि.मी. अंतरावर सरकारी वसाहत गांधीनगर येथे बिल्डिंग नं. 57 व 58 मधल्या म्हाडाच्या मोकळ्या जागेत मंत्री महोदयांनी कब्जा केला आहे, तिथे एअर कंडीशनअर ऑफिस व अन्य सुविधा असलेले 2000 स्के. फी. चे बांधकाम केलं. म्हाडाने  अनिल परब यांना हे बांधकाम गैरकायदेशीर असून त्यांनी स्वत: ते काढून टाकावे असा आदेश दिला तरी मंत्री महोदय काढत नाहीत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.