Kisan Credit Card ची मर्यादा 5 लाखांवर ; आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये नवा नियम लागू होणार !

Kisan Credit Card ची मर्यादा 5 लाखांवर ; आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये नवा नियम लागू होणार !

66
Kisan Credit Card ची मर्यादा 5 लाखांवर ; आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये नवा नियम लागू होणार !
Kisan Credit Card ची मर्यादा 5 लाखांवर ; आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये नवा नियम लागू होणार !

नवीन आर्थिक वर्षात अनेक नवीन नियम लागू होणार आहेत, जे २०२५ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आले होते. १ फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या. यातील सर्वात मोठी घोषणा म्हणजे किसान क्रेडिट कार्ड (KCC) (Kisan Credit Card) ची मर्यादा वाढवणे. आता शेतकऱ्यांना ३ लाख रुपयांऐवजी ५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाईल. (Kisan Credit Card)

शेतकऱ्यांना मोठा फायदा
किसान क्रेडिट कार्ड (KCC) ची मर्यादा ३ लाख रुपयांवरून ५ लाख रुपये करण्याचा निर्णय शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरेल. यामुळे त्यांना त्यांच्या शेती आणि संबंधित गरजांसाठी अधिक निधी सहज उपलब्ध होईल. ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत, केसीसी खात्यांतर्गत देण्यात आलेली रक्कम १० लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त झाली आहे, ज्यामुळे ७.७२ कोटी शेतकऱ्यांना थेट फायदा झाला आहे. मार्च २०१४ मध्ये ही रक्कम फक्त ४.२६ लाख कोटी रुपये होती. (Kisan Credit Card)

हेही वाचा-Girgaon मध्ये हिंदू नववर्षानिमित्त झाला मातृभाषेचा आणि अभिजात मराठीचा जागर

केंद्र सरकारनं कृषी मंत्रालयाचं बजेट 2.75 टक्क्यांनी कमी करुन 1.37 लाख कोटी केलं आहे. त्याचवेळी मत्स्यपालन, पशूपालन आणि डेअरीच्या निधीत 37 टक्क्यांची वाढून ते 7544 कोटी करण्यात आलं आहे.खाद्य प्रक्रियेसाठी 4364 कोटी करण्यात आलं. (Kisan Credit Card)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.