Nashik मध्ये शिक्षक मतदारसंघातून अखेर महायुतीचे Kishor Darade विजयी

२ जुलै रोजी सकाळी Kishor Darade यांना विजयी घोषित करण्यात आले. निवडणूक निकालानंतर विवेक कोल्हे यांनी शिवसेनेचे विजयी उमेदवार किशोर दराडे यांचे अभिनंदन केले आहे.

173
Nashik मध्ये शिक्षक मतदारसंघातून अखेर महायुतीचे Kishor Darade विजयी
Nashik मध्ये शिक्षक मतदारसंघातून अखेर महायुतीचे Kishor Darade विजयी

विधान परिषदेच्या नाशिक (Nashik) विभागीय शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी १ जुलैच्या रात्री उशिरापर्यंत चालू होती. अखेर २ जुलैच्या सकाळी त्यांची घोषणा करण्यात आली आहे. महायुतीच्या किशोर दराडे (Kishor Darade) यांचा विजय झाला आहे. दराडे यांना अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांनी अटीतटीची लढत दिल्याने जवळपास २४ तास ही मतमोजणी सुरू होती. २ जुलै रोजी सकाळी दराडे यांना विजयी घोषित करण्यात आले. निवडणूक निकालानंतर विवेक कोल्हे यांनी शिवसेनेचे विजयी उमेदवार किशोर दराडे यांचे अभिनंदन केले आहे.

(हेही वाचा – Lonavala येथे पर्यटकांसाठी नियमावली जारी; निष्काळजी अधिकाऱ्यांवर होणार कारवाई)

दुसऱ्या फेरीत किशोर दराडे ८ हजार मतांनी आघाडीवर

दुसऱ्या फेरीत महायुतीचे उमेदवार किशोर दराडे सुमारे ८ हजार मतांनी आघाडीवर होते. प्रथम पसंतीच्या संभाव्य मतांचा कोटा पूर्ण होत नसल्याने दुसऱ्या पसंतीची मते मोजावी लागली. दुसऱ्या फेरीअखेर दराडे आघाडीवर होते.शिवसेनेचे उमेदवार किशोर दराडे, उबाठाचे उमेदवार अॅड. संदीप गुळवे आणि अपक्ष विवेक कोल्हे यांच्यात मतमोजणीत चुरस असली, तरी बाद मतांच्या घोळामुळे अधिकृत कोटा घोषित न करता सर्वप्रथमच प्रथम पसंतीची मते मोजण्यात आली.

महायुतीच्या किशोर दराडे यांना दुसऱ्या फेरीत २४ हजार ३९३, अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांना १५९८५, तर महाविकास आघाडीच्या संदीप गुळवे यांना १४९९२ मते पडली. मतमोजणीदरम्यान ६४ हजार ८४८ मतपत्रिकांपैकी पहिल्या फेरीत ३० हजार मतपत्रिकांची, दुसऱ्या फेरीत पुढील ३० हजार मतपत्रिकांची, तर तिसऱ्या फेरीत उर्वरित ४ हजार ८४८ मतपत्रिकांची मोजणी करण्यात आली. दुसऱ्या फेरीत दराडे यांनी आपली आघाडी कायम ठेवली.

का उडाला गोंधळ ?

शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी अंबड येथील केंद्रीय वखार महामंडळाच्या गोदामात सोमवारी (दि.१) पडली. सकाळी आठ वाजता मतमोजणीची सुरुवात झाल्यानंतर पहिल्या अर्धा तासातच ३ मतदान केंद्रात जास्त मतपत्रिका आढळल्याने गोंधळ उडाला. उबाठाचे पदाधिकारी सुधाकर बडगुजर, दत्ता गायकवाड, वसंत गीते, विनायक पांडे यांनी त्यास हरकत घेतली, त्यानंतर त्या केंद्रातील मतपेटी बाजूला ठेवण्यात आली. त्यानंतर सुरळीत झालेल्या मतमोजणीत पहिल्या ३० हजार मतपत्रिका मोजून त्यातील बाद झालेल्या मतपत्रिका बाजूला काढण्यात आल्या. त्यानंतर मतमोजणी सुरू करण्यात आली. बाद मतांवर घेण्यात आलेले आक्षेप आणि वाढीव मते यामुळे अधिकृत बाद मतांची घोषणा न करताच मतमोजणी करण्यात आली.

मतांचा कोटा पूर्ण होत नसल्याने दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी करण्यात आली. त्यातही प्रथम पसंतीचे बहुमत पूर्ण न झाल्याने अखेर तिसरी फेरी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. अखेर सकाळी लवकर अंतिम निकाल घोषित करण्यात आला असून किशोर दराडे यांचा विजय झाला.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.