झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पात सदनिका देण्याच्या नावाखाली रक्कम घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी मुंबईच्या माजी महापौर किरोशी पेडणेकर यांच्यावर आरोप करण्यात आले होते व त्यांची चौकशीही करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा त्यांना चौकशीला सामोरे जावे लागत आहे. या प्रकरणामध्ये तीन आरोपींना अटक करण्यात आली होती. अटक केलेल्या आरोपींमधील संजय लोखंडे यांच्याशी किशोरी पेडणेकर यांचे व्हाट्सअप चॅटिंग सापडले होते. त्यामुळे पेडणेकर यांना चौकशीसाठी समन्स बजावले होते. त्यानुसार त्यांची अडीच तास चौकशी करण्यात आली.
भ्रष्टाचारी नेत्यांना तुरुंगात पोहोचवण्यामागे भाजप नेते किरीट सोमय्या यांचा मोठा वाटा आहे. कारण त्यांनी अशी अनेक प्रकरणे उघडकीस आणली आणि त्यामुळे जनतेला न्याय मिळाला. किरिट सोमय्या यांनी किशोरी पेडणेकरांवर याआधी आरोप केले होते. हे सुरु असताना किशोरी पेडणेकर यांच्या सासूबाई श्रीमती विजया पेडणेकर यांचं ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.
ही घटना खरंच दुर्दैवी आहे. सर्व जण किशोरी पेडणेकरांच्या दुःखात सहभागी आहेत. परंतु आता पेडणेकरांनी ही घटना कॅश करायचं ठरवलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांच्या होणार्या आरोपांमुळे त्यांच्या सासूबाईंनी धसका घेतला आणि त्यांना ह्रदयविकाराचा झटका येऊन त्यांचं निधन झालं. “माझा कुटुंबातील एक बळी घेतला. तरीही मी १ नोव्हेंबरला चौकशीला सामोरे जाणार.” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली होती.
आता चौकशीला समोर जाताना त्यांना मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची भेट घ्यायची आहे. खोके बोके असली भाषा करुन झाल्यानंतर एकनाथ शिंदे हे जुने शिवसैनिक असल्याचा साक्षात्कार त्यांना झाला आहे. पेडणेकर ह्या निर्दोष असतील तर त्यांना इतकी भीती का वाटतेय? आपल्यालाही संजय राऊत यांच्या शेजारी जावं लागेल ही भिती वाटतेय का त्यांना?
मुळात किशोरी पेडणेकर अनेक काळापासून राजकारणात आहेत. त्यांनी देखील बरेच आरोप अनेकांवर केले आहेत; अगदी खालच्या पातळीची भाषा स्वतः माजी महापौरांनी वापरलेली आहे. संजय राऊत अक्षरशः शिवराळ भाषेत बोलायचे, अशी पार्श्वभूमी असताना किशोरी पेडणेकर कोणत्या तोंडाने विक्टिम कार्ड खेळण्याचा प्रयत्न करत आहेत. व्हिक्टिम म्हणजे जी व्यक्ती बळी पडते, ती व्यक्ती सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करते.
इथे किशोरी पेडणेकरांवर आरोप झालेले आहेत. त्या चौकशीतून काही समोर आले नाही अथवा त्यांची यातून निर्दोष मुक्तता झाली तर वेगळी गोष्ट आहे. त्यामुळे त्यांनी इथे व्हिक्टिम कार्ड खेळण्याचा कितीही प्रयत्न केला तरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेत्यांबद्दल जनतेच्या मनात फारशी चांगली भावना नाही. हे येणार्या निवडणुकीत सिद्ध होईल. त्यामुळे त्यांचं विक्टिम कार्ड हे जनतेसाठी एक्यूज्ड कार्ड आहे. बाकी, त्यांच्या सासूबाई गेल्या, त्यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. सासूबाईंना सद्गती लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना.
Join Our WhatsApp Community