‘मनसे सरडाही लाजेल इतके रंग बदलणारा पक्ष’, पेडणेकरांची टीका

142

फटाके वाजवण्याला विरोध करणा-यांनी देश सोडून जावे, अशी भूमिका मनसेकडून घेण्यात आली होती. त्यानंतर मनसे आणि ठाकरे गट यांच्यात चांगलीच जुंपली आहे. मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी या मुद्द्यावरुन मुंबईच्या माजी महापौर आणि ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांच्यावर टीका केल्यानंतर आता पेडणेकर यांनीही प्रत्युत्तर दिले आहे. मनसे हा सरड्याला लाजवेल इतके रंग बदलणारा पक्ष असल्याची टीका पेडणेकर यांनी केली आहे.

पक्षाची इमेज काय हे माहीत आहे

सरडा पण लाजेल इतके रंग मनसे बदलते. भोंग्यांचा मुद्दा काढला ते काही काळ बंद झाले,पुन्हा आता भोंगे बाहेर आले. मनसे आता लोकांना गृहित धरू लागली आहे. लोकांनीही मनसेला गृहित धरलंच आहे. त्यामुळे इतकं खोटं बोलायचं आणि परत तेच करायचं त्यामुळे या पक्षाची काय इमेज आहे हे लोकांना आणि त्यांनाही माहीत आहे.

खोपकरांची टीका

पेडणेकरांना आता फटाक्यांचा त्रास होतो का? भोंग्यांचा त्रास त्यांना कधी झाला नाही का?, त्यांना कदाचित एमआयएमसोबत युती करयाची असेल म्हणून त्या अशी टीका करत असतील. या बेअक्कल लोकांनी शिवाजी पार्कवर जावं आणि जो सण आम्ही साजरा करत आहोत तो पहावा, अशा शब्दांत खोपकर यांनी पेडणेकरांवर निशाणा साधला होता.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.