किशोरी पेडणेकरांचा हल्लाबोल म्हणाल्या राज ठाकरे हे ‘सुपारी बहाद्दर’

105

राज ठाकरेंनी महाराष्ट्र दिनी घेतलेल्या जाहीर सभेत राज्य सरकारला मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी 4 मे चा अल्टीमेटम दिला आहे. त्यावर आता पलटवार करताना, मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी राज ठाकरेंना सुपारी बहाद्दर म्हटले आहे. सत्तेसाठी काहीही केले जात आहे. त्यासाठी लोकांचे जीव गेले, तरी चालतील पण मी ते करणार, असे कोण आहेत? हे सगळ्यांना कळत. असं म्हणत किशोरी पेडणेकर यांनी राज ठाकरेंवर टीका केली आहे. तसेच, त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचाही समाचार घेतला आहे.

तेव्हा कुठे गेला होतात?

शिवसेना बाबरी मस्जिद पाडण्यात नव्हती या देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्यानंतर त्याला उत्तर देताना, किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, सगळे मागचे रिपोर्ट त्यांनी तपासायला हवे. त्यावेळी आम्ही स्वत: गेलो होतो, पण महिलांनी यायचं नाही म्हणून आम्हाला गाडीतून बाहेर काढण्यात आले होते. अशा आम्ही 27 जणी होतो. बाबरीवरचे घुमट पाडल्यानंतर, त्याची जबाबदरी घेणारं कोणी नव्हतं त्यावेळी हिंदुह्रदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेबांनी बाबरीचे घुमट माझ्या शिवसैनिकांनी पाडले, असे म्हणत जाबाबदारी घेतली. मग तेव्हा का नाही उघडलं तोंड. त्यामुळे बाबरी मस्जिद ज्यावर शिवसैनिक चढले, त्यांचे कौतुक केले. त्यांना साहेबांनी घरी बोलावले, तेव्हा तुमचे वरिष्ठ नेतेही होते तेव्हा का गप्प बसलात त्याचे पहिले उत्तर द्या. मी आहे मी होतो म्हणून नाही चालत, असे म्हणत त्यांनी फडणवीसांनी सुनावले आहे.

यांच्यात तर केमिकल लोचा

तुम्ही गेला असाल, पण तुमच्या सोबत शिवसैनिकही  होते हे विसरु नका, असे कसे स्वप्न दोष व्हायला लागले. अशी कशी चित्रविचित्र स्वप्न पडू लागली. नजरेचा दोष वा स्वप्न दोष असं काही होतंय का.आम्ही असे म्हणतच नाही की तुम्ही नव्हते. आम्ही कधीही असले स्टेटमेंट दिलेले नाहीत. तुम्ही असालही. उत्तर प्रदेशात जे झाले त्याचे रेकाॅर्ड काढा आणि तपासा. मुन्नाभाई आपण सिनेमा बघतो ना तसं झालं आहे आता काही लोकांमध्ये केमिकल लोचा झाला आहे. भाजप राज ठाकरेंमध्ये केमिकल लोचा आहे, असं म्हणत किशोरी पेडणेकर यांनी बाबरी मुद्द्यावरुन फडणवीसांना सुनावले.

( हेही वाचा: लाऊड स्पीकर विक्रीवर आता कडक पहारा; खरेदीदाराची नोंद करण्याचे निर्देश )

तुम्ही हनुमान चालिसा लावा मी फिरुन येतो.

हनुमान चालिसा लावा मी फिरुन येतो. तरुण सैनिक आहात बसा आत जाऊन, बिघडवा तुमचा रेकाॅर्ड आणि भोगा तुम्ही, अशी राज ठाकरेंची भूमिका आहे. पण एक लक्षात ठेवा, मनसैनिक आता हुशार झाले आहेत त्यांना माहितीय की इलेक्शन पर्यंत हे भोंगे- सोंगे वाजत राहणार. नंतर मात्र त्यांनाच भोगावे लागणार आहे. नागरिकांनी संभ्रमात राहू नये. आपल्याला महाराष्ट्रात कुठलीही दंगल नको आहे. मी आज एमआयएमच्या नेत्यांचे ही ऐकले आहे त्यांनाही कुठेही दंगे नको आहेत, असे म्हणत किशोरी पेडणेकर यांनी नागरिकांना शांततेचे आवाहन केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.