‘बबली अजूनही नासमझ’, पेडणेकरांचा नवनीत राणांना टोला

102

नवनीत राणा यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर, त्यांनी मुख्यमंत्री आणि शिवसेनेवर टीकास्त्र सोडले. यावर आता मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी नवनीत राणांना टोला लगावला आहे. नवनीत राणांची मुख्यमंत्र्यांविरोधात लढण्याची लायकी नाही. बबली अजूनही नासमझ आहे, असे म्हणत पेडणेकरांनी शाब्दिक वार केले आहेत.

एक भोंगा आहे तर दुसरा सोंगा

नवनीत राणा यांच्या इशा-याला हल्लाबोल नाही तर खाज म्हणतात. जाणूनबुजून या महाराष्ट्रात मुंबईत दंगल परिस्थिती निर्माण करायची खाज आहे. याला हल्लाबोल म्हणत नाहीत. ज्या पद्धतीने राज्याचे मुख्यमंत्री संपूर्ण राज्यातच नाही तर देशात त्यांच्या विशेष कामासाठी अव्वल क्रमांकावर आले, ती खरी पोटदुखी आहे. एकाची बेंबीदुखी आहे तर एकाची पोटदुखी आहे. एक भोंगा आहे तर दुसरा सोंगा आहे. त्यांचा अॅंप्लिफायर तर वेगळाच आहे. याचाच अर्थ ही खाज आहे. हा हल्लाबोल होऊ शकत नाही.

( हेही वाचा: राणा दाम्पत्याचा जामीन रद्द होणार? माध्यमांशी बोलण्यास मनाई असताना दिला बाईट )

बबली अजूनही अल्लड 

नववीत राणा म्हणाल्या की मुख्यमंत्र्यांनी स्वत: जनतेपुढे येऊन लढावं, मी त्यांच्या विरोधात लढेन. त्यावरुन किशोरी पेडणेकर यांनी नवनीत राणा यांची थेट लायकी काढत त्यांना खडसावले आहे. लोकशाहीने अधिकार दिलेत म्हणून काहीही बोलू नका . तुम्ही आम्हाला शिकवू नका, तुम्ही खासदार आहात त्याप्रमाणे तुमचं वर्तन असू द्या. आम्हाला वाटलं होतं की बबली मोठी झाली पण, बबली मोठी झाली नाही. ती अजूनही अल्लड आहे. मागचा अॅंप्लिफायर लावला जात आहे आणि मग ती खाज वाढत आहे. या खाजेवर आमच्याकडे औषध आहे, असा खोचक टोला पेडणेकरांनी लगावला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.