Kishori Pednekar : डेड बॉडी बॅग प्रकरणी किशोरी पेडणेकर यांना ईडीचे पुन्हा समन्स

लवकरच होणार चौकशी

89
Kishori Pednekar : डेड बॉडी बॅग प्रकरणी किशोरी पेडणेकर यांना ईडीचे पुन्हा समन्स

माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांच्या अडचणींमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. किशोरी पेडणेकर यांना ED ने समन्स बजावला आहे.

कोरोनाकाळातील खिचडी घोटाळा प्रकरणी ईडीने किशोरी पेडणेकर यांना (Kishori Pednekar) पुन्हा एकदा समन्स बजावला असून गुरुवार २३ नोव्हेंबर रोजी हजर राहण्यास सांगितले आहे. ईडीच्या कार्यालयात त्यांची चौकशी केली जाणार आहे.

(हेही वाचा – Kishori pednekar : किशोरी पेडणेकर यांना आर्थिक गुन्हे शाखेकडून समन्स)

ईडीकडून ECIR दाखल

ईडीने याआधी बुधवारी, ८ नोव्हेंबर रोजी चौकशीसाठी समन्स बजावले होते. मात्र, प्रकृती अस्वास्थामुळे त्यांनी इतर दिवशी चौकशी करण्याची विनंती केली होती. अखेर ईडीकडून आता 23 नोव्हेंबर रोजी चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने नोंदवलेल्या गुन्ह्याच्या धर्तीवर ईडीने ECIR दाखल केले होते.

(हेही वाचा – Ayodhya Ram Mandir : राममंदिर प्रतिष्ठापनेचे नेत्यांना निमंत्रण नाही)

फसवणूकीची रक्कम सुमारे ४९.६३ लाख रुपये

खिचडी घोटाळामध्ये फसवणूकीची रक्कम सुमारे ४९.६३ लाख रुपये असल्याचे नमूद केले होते. त्यानंतर ईडी चौकशीसाठी काहींना समन्स बजावू शकते अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. त्यानंतर ईडीने किशोरी पेडणेकर आणि मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनाही चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजावले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.