Rahul Gandhi यांच्यावर डॉक्टर्स का आहेत नाराज?

63
Rahul Gandhi यांच्यावर डॉक्टर्स का आहेत नाराज?
  • प्रतिनिधी

काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर देशातील डॉक्टर्स मंडळींनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. प्रचारादरम्यान राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींचा मेमरी लॉस झाला असल्याचे विधान केले होते, त्यावरच डॉक्टर्स संघटनेने सोनिया गांधी यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली आहे. डॉक्टरांची एक संघटना आक्रमक झाली आहे. राहुल यांनी माफी मागावी, यासाठी या संघटनेने त्यांच्या आई व काँग्रेस माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनाच पत्र लिहिले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्याविषयी राहुल यांनी केलेल्या एका विधानावरून या संघटनेने नाराजी व्यक्त केली आहे.

(हेही वाचा – Maharashtra Assembly Election 2024: ईव्हीएम नेले त्या बसमध्ये शेवटच्या सीटखाली सापडले नोटांचे बंडल !)

नॅशनल मेडिकोज ऑर्गनायझेशन भारत संघटनेचे अध्यक्ष सी. बी. त्रिपाठी यांनी सोनिया गांधींना पत्र लिहिले आहे. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राहुल यांनी जो बायडेन यांची मेमरी लॉस झाल्याचे विधान केले होते. बायडेन यांच्याप्रमाणेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मेमरी लॉस झाली असावी, असे राहुल यांनी म्हटले होते. त्रिपाठी यांनी सोनिया गांधींना लिहिलेल्या पत्रात हे विधान अपमानजनक असल्याने राहुल यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी केली आहे. राहुल (Rahul Gandhi) यांच्या विधानावरून समजते की त्यांच्यामध्ये संवेदनशीलता नाही. सार्वजनिक व्यासपीठावर अशी विधाने चुकीचा संदेश देतात. त्यामुळे आमची संघटना निराश झाल्याचे त्रिपाठी यांनी पत्रात म्हटले आहे.

(हेही वाचा – निकालाच्या पूर्वसंध्येला Nana Patole यांच्या वक्तव्याने खळबळ; म्हणाले, मी आणि देवेंद्र फडणवीस…)

काय म्हटले होते राहुल गांधींनी?

राहुल गांधींनी (Rahul Gandhi) यांची अमरावती येथे 16 नोव्हेंबरला प्रचारसभा झाली होती. यावेळी त्यांनी मोदींवर टीका करताना जो बायडेन यांचे उदाहरण दिले होते. बायडेन यांच्या लक्षात काही गोष्टी राहत नसल्याचे सांगण्याचा प्रयत्न राहुल यांनी केला होता. यावेळी त्यांनी बायडेन यांच्याप्रमाणेच नरेंद्र मोदींचाही मेमरी लॉस झाला असावा, असे म्हटले होते.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.