Kolhapur Politics: सतेज पाटलांच्या कट्टर समर्थकाचा काँग्रेसला रामराम

Kolhapur Politics umesh apte resign as congress member
Kolhapur Politics: सतेज पाटलांच्या कट्टर समर्थकाचा काँग्रेसला रामराम

राज्यातील राजकारणातील घडामोडींना सध्या प्रचंड वेग आला आहे. विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकांमुळे राजकीय पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपचे सत्र सुरू आहे. यादरम्यान काँग्रेसमध्ये बंडखोरी आणि कुरघोडी अधिक घडताना दिसत आहेत. सत्यजित तांबे यांनी पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून काँग्रेस पक्षात नाराजीचे वातावरण पसरले आहे. अशा परिस्थितीत आता कोल्हापूरात (Kolhapur Politics) काँग्रेसला (Congress) मोठा धक्का देणारी घडमोड घडली आहे. माजी मंत्री आणि आमदार सतेज पाटील (Satej patil) यांचे कट्टर समर्थक आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष उमेश आपटे (Umesh Apte) यांनी काँग्रेसला रामराम ठोकला आहे. त्यामुळे उमेश आपटे भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चांणा उधाण आले आहे.

कोल्हापूर जिल्हा परिषेदेचे माजी अध्यक्ष उमेश आपटे यांना सतेज पाटील यांचे कट्टर समर्थक अशी ओळख आहे. मात्र आता आपटे यांनी तडकाफडकी काँग्रेसला राजीनामा दिल्याने पक्षात खळबळ उडाली आहे.

दरम्यान उमेश आपटे यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा देताना कौटुंबिक कारण दिल्याची माहिती मिळत आहे. तसेच पक्षात काम करत असताना काही अडचणींना सामोर जावे लागत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. यामुळे काँग्रेसमध्ये सर्व काही आलबेल असल्याचे म्हटले जात आहे. जरी उमेश आपटे यांनी काँग्रेस रामराम ठोकला असला तरी पुढील राजकीय प्रवासाबाबत स्पष्टता दिली नाही. पण आपटे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. जर आपटे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तर कोल्हापूरमधील भाजपचे आणखीन बळ वाढले जाईल, असे म्हटले जात आहे.

(हेही वाचा – पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याआधी गिरगावात बाळासाहेब ठाकरे-मोदींच्या पोस्टर्सनी वेधले लक्ष)

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here