kolkata Rape &amp Murder Case: ममतांनी PM मोदींना लिहिलेल्या पत्रावरून राजकीय युद्ध: भाजपाने केले ‘हे’ आरोप

195
Kolkata Rape & Murder Case: ममतांनी PM मोदींना लिहिलेल्या पत्रावरून राजकीय युद्ध: भाजपाने केले ‘हे’ आरोप
Kolkata Rape & Murder Case: ममतांनी PM मोदींना लिहिलेल्या पत्रावरून राजकीय युद्ध: भाजपाने केले ‘हे’ आरोप

कोलकाता येथील आर.जी. वैद्यकीय (R.G. Medical College) महाविद्यालयात प्रशिकणार्थी महिला डॉक्टर वर झालेल्या आत्याचारवरून राजकीय तापमान दिवसेंदिवस वाढत आहे. या क्रमवारीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान मोदींना लिहिलेल्या पत्रावरून टीएमसी आणि भाजपामध्ये पलटवार सुरू आहे. (Kolkata Rape & Murder Case)

पश्चिम बंगाल भाजपाचे उपाध्यक्ष सौमित्र खान (soumitra khan) यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधत हे पत्र लिहिणे म्हणजे नौटंकी असल्याचे म्हटले आहे. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना ते म्हणाले, ‘इतकं मोठं नाटक जगात कुठेही पाहायला मिळणार नाही. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (West Bengal CM Mamata Banerjee) यांनी दिलेले पत्र म्हणजे संपूर्ण नाटक आहे. (Kolkata Rape & Murder Case)

(हेही वाचा – काळे झेंडे – काळी पट्टी बांधून राज्यात होणार आंदोलन – Nana Patole)

काय म्हणाले सौमित्र खान?

सौमित्रा खान म्हणाले, ‘ममता बंदोपाध्याय या जगातील सर्वात नाट्यमय नेत्या आहेत.’ यासोबतच त्यांनी सीएम ममता बॅनर्जी यांच्यावर मोठा आरोप करत तुम्ही बलात्कार पीडितेच्या आईला १० लाख रुपयांना विकत घेत आहात, असे म्हटले आहे. 

ममता बॅनर्जींनी पत्रात काय लिहिले?

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून बलात्कारासारख्या भीषण प्रकरणातील आरोपींना १५ दिवसांच्या आत कठोर शिक्षा व्हावी आणि महिलांना सुरक्षित वातावरण मिळावे यासाठी कायदा करण्याची मागणी केली आहे. (Kolkata Rape & Murder Case)

(हेही वाचा – Water Cut : ‘या’ भागातील नागरिकांनी आतापासूनच पाणी वापरा जपून, कारण शुक्रवारसह शनिवारी राहणार पूर्ण कपात)

महिलांना सुरक्षित वाटावे यासाठी, अशा गुन्ह्यांमध्ये सामील असलेल्या व्यक्तींना अनुकरणीय शिक्षेची तरतूद करणारे कठोर केंद्रीय कायदे असावेत आणि अशा प्रकरणांच्या जलद सुनावणीसाठी जलदगती विशेष न्यायालये स्थापन करण्याचाही विचार केला पाहिजे, अशी मागणीही ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविलेल्या पत्रात केली आहे. (Kolkata Rape & Murder Case) 

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.