Konkan Railway : कोकणवासीयांसाठी महत्त्वाची बातमी!  रेल्वेब्लॉकमुळे ‘या’ गाड्या रखडणार

33
कोकणात जाणाऱ्या चाकारमान्यांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. कोकण रेल्वे मार्गावर येत्या २१ नोव्हेंबर आणि १ डिसेंबर रोजी ब्लॉक घेण्यात येणार आहे. दरम्यान, कारवार- हारवाड विभागा (Karwar- Harwad Division) दरम्यान पायाभूत बांधकामासाठी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे कोकण रेल्वेवरील काही रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांचा एक ते दोन तास प्रवास रखडणार आहे. कारवार-हारवाड विभागादरम्यान भुयारी पुलाचे बांधकाम करण्यासाठी २१ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ ते ४ दरम्यान आणि १ डिसेंबर रोजी दुपारी १२.३० ते दुपारी ४.३० दरम्यान ब्लाॅक घेण्यात येणार आहे. (Konkan Railway)
(हेही वाचा – Fadnavis यांची ही “लाडका विनोद” योजना आहे का? अनंत गाडगीळ यांचा सवाल)
२१ नोव्हेंबरच्या ब्लॉकमुळे गाडी क्रमांक ०९००५७ उधना – मंगळुरू रेल्वेगाडी (Udhna – Mangaluru train) आणि १ डिसेंबरच्या ब्लाॅकमुळे गाडी क्रमांक ११०९७ पुणे – एर्नाकुलम एक्स्प्रेस (Pune – Ernakulam Express) मडगाव – कारवार (Margaon – Karwar) स्थानकादरम्यान सुमारे २ तास थांबवण्यात येणार आहे. तर, २१ नोव्हेंबर आणि १ डिसेंबर रोजी गाडी क्रमांक ०६६०१ मडगाव – मंगळुरू रेल्वेगाडी मडगाववरून दुपारी २.१० वाजता सुटण्याऐवजी दुपारी ३.१० वाजता सुटेल. त्यामुळे या रेल्वेगाडीला एक तास विलंब होईल.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.