होळी (Holi 2025) सण तीन आठवड्यांवर येऊन ठेपला आहे. कोकणकर अनेकजण या सणाला गावी जातात. त्यामुळे महिनाभर आधीपासूनच चाकरमान्यांची रेल्वे (Railway) गाड्यांसह एसटी बसच्या (ST Bus Ticket) तिकीट बुकिंगसाठी रांगा लावतात. यामध्ये कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे दरवर्षी रेल्वे प्रशासनाकडून (Railway Administration) होळीनिमित्त कोकणवासियांसाठी विशेष रेल्वे गाड्या (Konkan Railway Holi Special Train) सोडण्यात येतात. तसेच यंदाही मध्य रेल्वे आणि कोकण रेल्वेने चाकरमान्यांसाठी रेल्वेगाड्या (Konkan Railway) चालविण्याचे आयोजन केले आहे. जाणून घ्या कसे असेल याचे वेळापत्रक. (Konkan Railway)
(हेही वाचा – Ladki Bahin Yojana मध्ये मोठा बदल; ९ लाख महिला ठरणार अपात्र)
गाडी क्रमांक ०११५१ सीएसएमटी – मडगाव विशेष रेल्वेगाडी सीएसएमटीवरून ६ मार्च, १३ मार्च रोजी मध्यरात्री १२ वाजून २० मिनिटांच्या सुमारास सोडण्यात येणार आहे. ही रेल्वेगाडी अनुक्रमे ७, १४ मार्च रोजी दुपारी १ वाजून ३० मिनिटांनी मडगाव येथे पोहोचेल.
गाडी क्रमांक ०११५२ मडगाव – सीएसएमटी विशेष रेल्वेगाडी मडगाव येथून ६ मार्च, १३ मार्च रोजी दुपारी २ वाजून १५ मिनिटांच्या सुमारास सोडण्यात येणार असून ही रेल्वेगाडी त्याच दिवशी मध्यरात्री ३ वाजून ४५ मिनिटांनी सीएसएमटीला पोहोचेल.
Running of Special Trains during Holi Festival – 2025 pic.twitter.com/CkEULHT4OF
— Konkan Railway (@KonkanRailway) February 20, 2025
थांबा : या रेल्वेगाडीला दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलावडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिवीम या रेल्वे स्थानकांवर थांबा असेल.
दरम्यान, या रेल्वेगाडीला एकूण २४ डबे असतील. प्रथम श्रेणीचा एक डबा, प्रथम आणि द्वितीय श्रेणीचा एकत्र एक डबा, द्वितीय श्रेणीचे दोन डबे, तृतीय श्रेणीचे १० डबे, शयनयान चार डबे, जनरल चार डबे, एसएलआरचे दोन डबे असतील.
(हेही वाचा –आग्र्यावरून सुटकेचा दिवस ‘शिवचातुर्य दिन’ म्हणून साजरा होणार; मंत्री Ashish Shelar यांची घोषणा)
- गाडी क्रमांक ०११२९ लोकमान्य टिळक टर्मिनस – मडगाव १३ मार्च, २० मार्च रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून रात्री १० वाजून १५ मिनिटांच्या सुमारास सुटेल. ही रेल्वेगाडी अनुक्रमे १४ मार्च आणि २१ मार्च रोजी दुपारी १२ वाजून ४५ मिनिटांनी मडगाव येथे पोहोचेल.
- गाडी क्रमांक ०११३० मडगाव – लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष रेल्वेगाडी १४ मार्च, २१ मार्च रोजी मडगाव येथून दुपारी १ वाजून ४० मिनिटांच्या सुमारास सुटेल. ही रेल्वेगाडी २२ मार्च रोजी पहाटे ४ वाजून ५ मिनिटांनी वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल.
थांबा : या रेल्वेगाडीला ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलावडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवीम आणि करमळी स्थानकांवर थांबा असेल.
या रेल्वेगाडीला एकूण २० डबे असतील. प्रथम श्रेणीचा एक डबा, द्वितीय श्रेणीचे दोन डबे, तृतीय श्रेणीचे सहा डबे, शयनयानचे आठ डबे, पॅन्ट्री कारचा एक डबा, जनरेटर कारचे दोन डबे असतील.
(हेही वाचा – BMC : मुंबईत महापालिकेच्या २ हजार ४८४ स्वच्छता कर्मचाऱ्यांचे ‘नमस्ते’)
आरक्षण : या रेल्वेगाड्यांचे तिकीट आरक्षण २४ फेब्रुवारी रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि आयआरसीटीसी या संकेतस्थळावर सुरू होईल, अशी माहिती कोकण रेल्वेद्वारे दिली.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community