राज्यभवनातील क्रांती गाथा दालन हे एक तीर्थस्थळच – मुख्यमंत्री

98

राजभवन येथील ब्रिटिशकालीन बंकरमध्ये “क्रांती गाथा” या भूमिगत दालनाचे तसेच जल भूषण या नवीन इमारतीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंगळवारी उदघाटन करण्यात आले. यावेळी संबोधित करताना उद्धव ठाकरे बोलत होते. क्रांतिकारी गॅलरीचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन होणे हा चांगला मुहूर्त असून राजभवनातील क्रांती गाथा दालन हे एक तीर्थस्थळच असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

काय म्हणाले मुख्यमंत्री?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलताना म्हणाले, स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करतांना क्रांती गाथा दालनाचे उदघाटन हा एक योगायोगच नाही तर एक  चांगला मुहूर्त आहे. जे स्वातंत्र्य उपभोगतो आहोत त्यासाठी कितीजणांनी आपल्या घरादारावर निखारे ठेवले, किती जणांनी बलिदान दिलं, कितीजणांनी मरण यातना सोसल्या, क्षणभर विचार केला हे असं घडलं नसतं तर… आपण हे स्वातंत्र्य उपभोगू शकलो असतो का हा प्रश्न मनात येतो.

(हेही वाचा – विद्यार्थ्यांना एकदा तरी अंदमानात नेऊन वीर सावरकरांनी भोगलेल्या यातना दाखवा! पंतप्रधानांचे आवाहन)

क्रांतिकारी गॅलरीमुळे समोरच्या पिढीला सैनिकांची माहिती होईल. गॅलरी काढून काहीही होणार नाही. आपल्याला स्वातंत्र्य असंच नाही मिळाले, ते कुणी आपल्याला आंदण नाही दिलं हे स्वातंत्र्य आपल्याला लढून मिळवावं लागलं आहे. तो इतिहास नुसता जतन नाही तर जिवंत करणं हे आपलं काम आहे. काळ पुढे जात आहे. आपण पारतंत्र्यात १५० वर्षे होतो आता स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली, पुढे जात असतांना हा वारसा पुढच्या पिढीला देण्याच काम केलं नाही तर मला वाटतं आपण आपल्या कर्तव्याला मुकतो आहोत, असे म्हणत त्यांनी मोदींसमोर आठवण करून दिली.

हा माझ्यासाठी सार्थकतेचा क्षण

पुढे मुख्यमंत्री ठाकरे असे म्हणाले की, काळ बदलत असला तरी या परिसराने इतिहासाच्या पाऊलखुणा नेहमीच जपल्या आहेत. त्याला धक्का न लावता नुतनीकरण करणं, आधुनिक तंत्रज्ञानं हे काम करणं खुप मोठी गोष्ट आहे. कलात्मक नजरेने याकडे पहातांना प्रत्येक ठिकाणी त्याचे सौंदर्य दिसते. इतक्या चांगल्याप्रकारे हे नुतनीकरणाचे काम करण्यात आले आहे. मला या दालनाच्या उदघाटनप्रसंगी उपस्थित रहाता आलं हा माझ्यासाठी सार्थकतेचा क्षण असल्याचे म्हटले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.