क्रांती रेडकरची मुख्यमंत्र्यांना बहिणीच्या नात्याने आर्जव! म्हणाली…

एनसीबीचे प्रमुख समीर वानखेडे यांच्या बाजूने त्यांची पत्नी, मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री क्रांती रेडकर समोर आल्या आहेत. त्यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे.

112

सध्या एनसीपीचे प्रवक्ते नवाब मलिक आणि एनसीबीचे प्रमुख समीर वानखेडे यांच्यातील वाद शांत होण्याचे नाव घेत नाही. मलिक एकामागोमाग एक नवीन आरोप वानखेडेंवर करत आहेत. त्यामध्ये त्यांच्या वैयक्तीक गोष्टीही उघड करत आहेत. त्यात त्यांच्या कुटुंबियांच्या उल्लेख आहे. त्यामुळे आता वानखेडे यांच्या बाजूने त्यांची पत्नी, मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री क्रांती रेडकर समोर आल्या आहेत. त्यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे.

क्रांती रेडकर यांचे पत्र जसेच्या तसे!

माननीय उद्धव ठाकरे साहेब, लहानपणापासून मराठी माणसाच्या न्याय्य हक्कासाठी लढणारी शिवसेना पाहत लहानाची मोठी झालेली मी एक मराठी मुलगी आहे.. छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ह्यांचा आदर्श घेऊनच मी वाढले.. कुणावर अन्याय करू नये आणि आपल्यावर होणारा अन्याय सहन तर मुळीच करू नये, हे त्या दोघांनी शिकवलं.. तोच धडा गिरवत आज मी एकटीने माझ्या खासगी जीवनावर हल्ला करणाऱ्या उपद्रवी लोकांविरोधात ठामपणे उभी आहे.. लढते आहे.. सोशल मीडिया, त्यावरचे लोक फक्त मजा बघतायत..

मी एक कलाकार आहे. राजनीती मला कळत नाही.. आणि मला त्यात पडायचं सुद्धा नाही..आमचा काहीही संबंध नसताना रोज़ सकाळी आमच्या अब्रू ची लक्तरे चार चौघात उधळली जातात.. शिवरायांच्या राज्यात एका स्त्रीच्या गरिमेचा खेळ करून ठेवला आहे. विनोद करून ठेवला आहे..

आज बाळासाहेब असते तर त्यांना हे नक्कीच पटलं नसतं.. एका महिलेवर आणि तिच्या परिवारावर होणारे खाजगी हल्ले हे राजकारणाचं किती नीच स्वरूप आहे हे नेहमीच त्यांच्या विचारातून आमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे.. आज ते नाही पण तुम्ही आहात.. त्यांची सावली त्यांची प्रतिमा आम्ही तुमच्यात बघतो..तुम्ही आमचे नेतृत्व करत आहात आणि तुमच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. तुम्ही कधीच माझ्यावर व माझ्या कुटुंबावर अन्याय होऊ देणार नाही ह्याची मला खात्री आहे.. म्हणून एक मराठी माणूस म्हणून आज मी तुमच्याकडे न्यायाच्या अपेक्षेने पाहतेय.. तुम्ही योग्य तो न्याय करा अशी विनंती.

– आपली बहिण, क्रांति रेडकर.

(हेही वाचा :  नवाब भाईंना ‘तो’ अधिकार दिला कुणी? चित्रा वाघ यांचा सवाल)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.