क्रीडा संस्कृती फाऊंडेशन नाशिकद्वारा शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांना, राज्यस्तरीय आर्दश शिक्षक पुसस्कार देऊन गौरविण्यात येते. यावर्षी महाराष्ट्र मिलिटरी स्कूल तळवली (बा) मुरबाड जि. ठाणे येथील शारीरिक शिक्षक व क्रिडा विभागप्रमुख राजेंद्र तिवारी यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. राज्यस्तरीय आर्दश शिक्षक पुरस्कार, सोहळा गुरुवार, २३ जून २०२२ रोजी सकाळी १०.०० वाजता शुभमंगल कार्यालय, रासबिहारी शाळेमागे, बळी मंदिर शेजारी आग्रा रोड पंचवटी नाशिक येथे झाला.
राजेंद्र तिवारी आंतरराष्ट्रीय दर्जाचे मानांकन प्राप्त हॉकी कोच
महाराष्ट्र मिलिटरी स्कूल तळवली (बा) मुरबाड जि. ठाणे येथील सैनिकी विद्यालयाचे शारीरिक शिक्षक व क्रीडा विभाग प्रमुख राजेंद्र तिवारी येथे कार्यरत आहेत. ते आंतरराष्ट्रीय दर्जाचे मानांकन प्राप्त हॉकी कोच आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयातील अनेक विद्यार्थीनी विभागीय व राज्य तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक पुरस्कार प्राप्त करुन विद्यालयाचे नावलौकीक वाढविले आहे. क्रीडा जगतात मानाची समजली जाणारी मुंबई विभागामधील मेजर ध्यानचंद हॉकी ट्रॉफी सलग चार वेळा राजेंद्र तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली मिळविली असून मुंबई, पुणे, नाशिक विभागात हॉकी विश्वात नावलौकीक प्राप्त केले आहे. हॉकी स्पर्धामधून राज्य तसेच राष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्र मिलिटरी स्कूलमधील एकूण ३५० विद्यार्थ्यांनी प्राविण्य मिळविले असून, सन २००५ व २००८ – ००९ या कालावधीत राजेंद्र तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली स्कूलच्या हॉकी संघाने नेहरू व साई हॉकी स्पर्धेत दिल्ली व छत्तीसगढ येथे राज्य तसेच राष्ट्रीय पातळीवर सहभाग नोंदवून महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व केले आहे. सन २००२ व २०१४ या कालावधीत, महाराष्ट्र राज्य स्तरीय हॉकी स्पर्धेत सलग विजय मिळवत विजेता संघ म्हणून स्कूलच्या हॉकी संघाने मान राखला आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत, क्रिडा संस्कृती फाऊंडेशन नाशिक यांच्या विद्यमाने राजेंद्र तिवारी यांना राज्य स्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
(हेही वाचा Hindusthan Post Impact : महाविकास आघाडी सरकारच्या ‘जीआर’चा मुद्दा पहिला ‘हिंदुस्थान पोस्ट’नेच उजेडात आणला!)
सर्व स्तरावरून अभिनंदन
राज्य स्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल, स्वातंत्र्यवीर सावरकर सेवा समितीचे कार्यवाह रणजित सावरकर, सुर्यकांत पाटील, संस्थेचे सर्व पदाधिकारी स्कूलचे प्राचार्य काशिनाथ भोईर तसेच विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व सर्व विद्यार्थ्यांनी राजेंद्र तिवारी यांचे अभिनंदन केले आहे
Join Our WhatsApp Community