“श्रीकृष्णाने अर्जुनाला जिहाद सांगितला”; माजी गृहमंत्री शिवराज पाटील यांचे वादग्रस्त वक्तव्य

162

जिहाद ही संकल्पना केवळ इस्लाममध्ये नसून भगवद्गीता आणि ख्रिश्चन धर्मातही आहे, असे विधान ज्येष्ठ काॅंग्रेस नेते शिवराज पाटील यांनी केले आहे. श्रीकृष्णाने अर्जुनाला जिहाद शिकवला आहे, असेही यावेळी त्यांनी म्हटले. काॅंग्रेसच्या नेत्या आणि माजी केंद्रीय मंत्री मोहसिना किडवई यांच्या चरित्राच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. शिवराज पाटील यांच्या विधानानंतर वाद निर्माण झाला असून, त्यांच्यावर टीका होत आहे.

काय म्हणाले शिवराज पाटील?

इस्लाम धर्मात असलेल्या जिहाद या संकल्पनेबाबत अनेकदा बोलले जाते. हेतू चांगला असेल, काही चांगले करायचे असेल आणि ते कुणी मान्य करत नसेल, तर बळाचा वापर केला जाऊ शकतो, अशी ही संकल्पना आहे. केवळ कुराणच नव्हे, तर महाभारतातील गीतेमध्ये आणि ख्रिश्चन धर्मातही हेच सांगितले आहे. श्रीकृष्णानेही अर्जुनाला जिहाद शिकवला आहे, असे शिवराज पाटील म्हणाले आहेत.

( हेही वाचा: Nirav Modi Property seize: नीरव मोदीच्या 39 मालमत्ता जप्त होणार; ‘या’ मालमत्तांचा समावेश )

शिवराज पाटील यांचं मानसिक संतुलन बिघडलंय

शिवराज पाटील यांच्या विधानावर भाजप नेते अतुल भातखळकर यांनी टीका केली आहे. मुस्लिम मतांसाठी किती शेण खाणार ? अशी विचारणा त्यांनी केली आहे. शिवराज पाटील यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. ज्या काॅंग्रेसने रामाचे अस्तित्व नाकारलं, ज्या राहूल गांधींनी हिंदू दहशतवाद, असा उल्लेख केला, तुकडे-तुकडे गॅंगचे समर्थन केले, त्या पक्षाच्या नेत्याकडून इतर काही अपेक्षा करु शकत नाही, असे भातखळकर म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.