महापालिका निवडणुकीच्या तोंडावर कृपाशंकर सिंह यांचा भाजपप्रवेश!

कृपाशंकर सिंह गेल्या काही वर्षांपासून राजकारणाच्या मुख्य प्रवाहात येण्याच्या प्रयत्नात होते. मात्र त्यांच्या प्रयत्नांना अपयश येत होते.

185

काँग्रेसचे मुंबईचे माजी शहराध्यक्ष आणि माजी राज्यमंत्री कृपाशंकर सिंग यांनी अखेर भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत कृपाशंकर सिंग यांना पक्षात प्रवेश देण्यात आला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ते काँग्रेसमध्ये अडगळीत पडलेले होते.

कलम ३७० विरोधात जागृती केली!

दरम्यान मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परप्रांतीयांना खूश करण्यासाठी कृपाशंकर सिंह यांचा भाजपप्रवेश विशेष महत्वाचा मानला जात आहे. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले कि,  जिथे लोक भाजपच्या विरोधात एकवटले तिथे भाजप वाढतो. त्यामुळे १-२ टर्म सत्ता नसेल तर आम्ही विचार करत बसत नाही. ज्यावेळी ३७० कलमचा विषय आला, त्यावेळी त्यांच्यातील राष्ट्रवाद जागा झाला,  तेंव्हा त्यांना वाटले की भारताला एक संघ बनवण्यासाठी मोदी हे प्रयत्न करत असेल तर मदत केली पाहिजे. त्यांनी २१ महिने झाले काँग्रेस सोडून ते मधल्या काळात ३७० कलम बद्दल जनगागृती करत होते, त्यामुळे त्यांना भाजपमध्ये प्रवेश दिला आहे, ते फडणवीस म्हणाले.

(हेही वाचा : एकनाथ खडसेंचे जावई गिरीश चौधरींना ईडीकडून अटक)

विश्वास सार्थ ठरवणार! – कृपाशंकर सिंह 

तर कृपाशंकर सिंह यांनी, देवेंद्र फडणवीस यांनी मला कधी अडचणीत आणले नाही. मंत्री असताना ते प्रश्न विचारायचे. मी सांगायचो की नंतर उत्तर देतो, ते मान्य करायचे. मी ठरवले की जर मला राजकारण करायचे असेल तर ते भाजपमध्येच करेन. तुम्ही माझ्यावर एकदा विश्वास दाखवा मी तो पूर्ण करेन. कृपाशंकर सिंह गेल्या काही वर्षांपासून राजकारणाच्या मुख्य प्रवाहात येण्याच्या प्रयत्नात होते. मात्र त्यांच्या प्रयत्नांना अपयश येत होते. काही दिवसांपूर्वी त्यांनी सिंधुदुर्गात जाऊन भाजपचे खासदार नारायण राणे यांच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आणि मुंबईत ते करू पाहत असलेल्या उत्तर भारतीयांच्या एक लाखांच्या मेळाव्याला अमित शहा यांनी यावे, असे त्यांनी निमंत्रण दिले होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.