वंदना बर्वे
भारतीय जनता पक्षाला देशाच्या सत्तेतून बेदखल करण्यासाठी देशभरातील तमाम विरोधी पक्ष पाटणात एकजूट झाले असतानाच भारत राष्ट्र समितीचे कार्यकारी अध्यक्ष आणि तेलंगनाचे उद्योग आणि माहिती मंत्री केटी रामा राव यांनी शुक्रवार २३ जून रोजी दिल्ली गाठली. ते दिल्लीत दोन दिवस राहणार असून गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या भेटी घेणार आहेत.
तेलंगनाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी भाजपविरोधी पक्षांच्या बैठकीला दांडी मारल्यामुळे दिल्लीच्या राजकारणात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी विरोधकांच्या बैठकीला १८ पक्ष हजर राहणार असल्याचे म्हटले होते. परंतु, आज फक्त १५ पक्षांच्या नेत्यांनीच या बैठकीला हजेरी लावली. विरोधी पक्षांच्या या बैठकीला दांडी मरणाऱ्यांमध्ये तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचा भारत राष्ट समिती, जयंत चौधरी यांचा लोकदल पक्ष आणि पंजाबमधील शिरोमणी अकाली दलाचा समावेश आहे. चंद्रशेखर राव यांना या बैठकीचे निमंत्रण देण्यात आले नव्हते, हेही महत्वाचे आहे. महत्वाचे म्हणजे, कालच विरोधी पक्षांची बैठक होती आणि कालच या बैठकीला दांडी मारत तेलंगणाचे मुख्यमंत्री राव यांचे चिरंजीव आणि राज्याचे माहिती आणि उद्योग मंत्री केटी रामा राव दिल्लीत दाखल झाले आहेत. ते येथे गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्यासह विविध केंद्रीय मंत्र्यांच्या भेटी घेणार आहेत. अमित शहा यांच्यासोबतची त्यांची ही पहिलीच भेट असेल, हा उल्लेखनीय बाब आहे.
(हेही वाचा – कोविड टेंडर घोटाळा; जाणून घ्या नक्की कोण आहे यासीर फर्निचरवाला)
केटी रामाराव यापूर्वी जून २०२२ मध्ये दिल्लीला आले होते. तेव्हा त्यांनी तत्कालिन पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर मुख्यमंत्री चंद्रशेखर राव आणि समस्त भारत राष्ट समितीचे नेते केंद्र सरकारवर तेलंगणाशी सावत्र व्यवहार करीत असल्याचा आरोप करीत आहेत.
दरम्यान, केटी रामाराव यांची दिल्लीवारी फक्त तेलंगनातील प्रलंबित प्रकल्पांचा विषय मार्गी लावण्यासाठी आहे. याचा राजकीय अर्थ काढला जावू नये, असे भारासच्या नेत्यांनी म्हटले आहे. मात्र, या दिल्लीवारीचं टायमिंग खूप काही सांगणारं आहे. कालच म्हणजेच शुक्रावर २३ जून रोजी पाटणात बैठक होत आहे आणि कालच ते दिल्लीत दाखल झाले आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community