पंजाबमध्ये AAP च्या मंत्र्याचा अजब कारभार; अस्तित्वात नसलेल्या खात्याचा २० महिने सांभाळला कारभार

97
पंजाबमध्ये AAP च्या मंत्र्याचा अजब कारभार; अस्तित्वात नसलेल्या खात्याचा २० महिने सांभाळला कारभार
पंजाबमध्ये AAP च्या मंत्र्याचा अजब कारभार; अस्तित्वात नसलेल्या खात्याचा २० महिने सांभाळला कारभार

पंजाबचे (Punjab) मंत्री कुलदीप सिंह धालीवाल (Kuldeep Singh Dhaliwal) हे जवळपास २० महिने ज्या विभागाचा कार्यभार सांभाळत होते. तो विभागाच अस्तित्वात नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. राज्याच्या मुख्य सचिवांनी जारी केलेल्या राजपत्र अधिसूचनेचा हवाला देत ट्रिब्यूनने ही माहिती दिली आहे. अधिसूचनेत म्हटले आहे की, “मंत्र्यांमध्ये विभाग वाटप करण्याबाबतच्या मागील पंजाब सरकारच्या अधिसूचनेत अंशतः बदल करून, धालीवाल यांना पूर्वी वाटप केलेला प्रशासकीय सुधारणा विभाग आजपर्यंत अस्तित्वात नाही.”

( हेही वाचा : Tauhid Ali ने केली हिंदू मुलीची हत्या; आधी गळा चिरला, मग हात कापून…

आम आदमी पक्षाचे (AAP) नेते कुलदीप सिंह धालीवाल (Kuldeep Singh Dhaliwal) आता पंजाब मंत्रिमंडळात फक्त एनआरआय व्यवहार विभाग सांभाळतील. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Mann) यांच्या आदेशानुसार धालीवाल यांच्या विभागात सुधारणा करण्याचा निर्णय दि. ७ फेब्रुवारी २०२५ पासून लागू झाला, असे अधिसूचनेत म्हटले आहे. सुरुवातीला, धालीवाल यांच्याकडे कृषी आणि शेतकरी कल्याण खाते होते, जे मे २०२३ मध्ये झालेल्या मंत्रिमंडळ फेरबदलादरम्यान त्यांच्याकडून काढून घेण्यात आले. यानंतर त्यांना प्रशासकीय सुधारणा विभाग देण्यात आला. (Punjab)

सप्टेंबर २०२४ मध्ये आणखी एक मंत्रिमंडळ फेरबदल

सप्टेंबर २०२४ मध्ये पुन्हा एकदा मंत्रिमंडळात फेरबदल झाल्यानंतरही, धालीवाल यांनी केवळ कागदावर अस्तित्वात असलेल्या विभागाचा कार्यभार साभाळण्यासाठी देण्यात आला. सूत्रांनी दिेलेल्या माहितीनुसार, द ट्रिब्यूनला सांगितले की प्रशासकीय सुधारणा विभागाला कोणताही कर्मचारी नियुक्त करण्यात आला नव्हता आणि त्यांनी कोणत्याही बैठका घेतल्या नव्हत्या. तसेच धालीवाल यांना प्रशासकीय सुधारणा विभाग दिल्यानंतर, त्यांनी सरकारकडून स्पष्टता मागितली कारण त्यांच्या विभागात सचिव नव्हता. धालीवाल अलिकडेच अनिवासी भारतीय व्यवहार मंत्री म्हणूनही चर्चेत आले होते, ते अमृतसरमध्ये आलेल्या अमेरिकन निर्वासितांची काळजी घेत आहेत. (AAP)

दरम्यान पंजाब सरकारच्या या प्रकारावर प्रतिक्रिया देताना भाजप (BJP) नेते अमित मालवीय (Amit Malviya) म्हणाले की, “पंजाब सरकारला त्यांच्या एका प्रमुख मंत्र्याला सोपवलेले खाते प्रत्यक्षात कधीच अस्तित्वात नव्हते हे समजण्यासाठी जवळजवळ २० महिने लागले. त्यामुळे पुन्हा हे सरकार किती संकटग्रस्त आहे हे तुम्ही लक्षात घेऊ शकता. अरविंद केजरीवाल हे ढोंगी आहेत. ज्यांना सार्वजनिक जीवनातून हाकलून लावले पाहिजे.” (AAP)

भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रदीप भंडारी (Pradeep Bhandari) यांनीही पंजाबमधील (Punjab) आपच्या नेतृत्वाखालील सरकारवर टीका केली आणि म्हटले की, “आपने पंजाबमधील (Punjab) राज्य कारभाराला विनोद बनवले आहे! आपच्या मंत्र्यांनी २० महिने असा विभाग चालवला जो कधीच अस्तित्वात नव्हता! कल्पना करा, २० महिने मुख्यमंत्र्यांना हेही माहित नव्हते की एक मंत्री “अस्तित्वात नसलेला विभाग” चालवत आहे.” भटिंडाच्या खासदार आणि शिरोमणी अकाली दलाच्या नेत्या हरसिमरत कौर बादल यांनीही या बातमीवर प्रतिक्रिया देताना सांगितले की, “आप-पंजाब येथील प्रशासन. अस्तित्वात नसलेले विभाग अशा मंत्र्यांना देण्यात आले आहेत. ज्यांना स्वतःकडे असलेल्या खात्यांची माहिती नाही. हे सर्व घडत आहे कारण मंत्र्यांना प्रशासनात कोणतीही भूमिका नाही कारण सरकार दिल्लीतून रिमोट कंट्रोल केले जात आहे.” (AAP)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.