कुळगांव- बदलापूर नगरपरिषदेने कोविड काळात रोग प्रतिबंधक आणि रुग्णाच्या औषधोपचारांसाठी केलेल्या खर्चापोटी वीस कोटी रुपये देण्याच्या प्रस्तावास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली आहे.
( हेही वाचा : नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाला ९,२७९ कोटींची सुधारित मान्यता)
कुळगांव – बदलापूर नगरपरिषदेशी निगडीत विविध विषयांबाबत सह्याद्री राज्य अतिथीगृहात नुकताच मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली होती. या बैठकीत बदलापूर नगरपरिषदेच्यावतीने या निधीबाबत मागणी करण्यात आली होती. कोरोनाकाळात बदलापूर नगरपरिषदेने आपल्या स्वनिधीतून रोग प्रतिबंधात्मक आणि रुग्णांच्या उपचार, आदी अनुषांगिक बाबींसाठी खर्च केला होता. विशेषतः नगरपरिषदेने नागरी तसेच ग्रामीण भागात प्रभावी काम केल्याचे बैठकीत मांडण्यात आले होते.
एकंदर कोविड काळातील काम तसेच नगरपरिषदेची आर्थिक निकड पाहता राज्याच्या मुख्यमंत्री सहायता निधी कोविड- १९ या खात्यातून कुळगांव बदलापूर नगरपरिषदेला २० कोटी रुपये देण्यास मुख्यमंत्री शिंदे यांनी मान्यता दिली आहे. त्यानुसार हा निधी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना वर्ग करण्यात येणार आहे.
Join Our WhatsApp Community