उत्तर प्रदेश भाजपाने (BJP) राज्यसभेच्या ७ जागांसाठी ३५ नावांची यादी तयार केली आहे. नेते सुधांशू त्रिवेदी यांना पुन्हा राज्यसभेवर पाठवण्याच्या प्रस्तावासोबतच या यादीमध्ये कवी कुमार विश्वास (Kumar Vishwas) यांच्या नावाचीही चर्चा आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत कुमार विश्वास राजकीय वर्तुळात दिसण्याची शक्यता आहे.
(हेही वाचा – Coastal Road : वर्सोवा ते दहिसर या कोस्टल रोडसाठी हे असे नेमले कंत्राटदार )
उत्तर प्रदेशमधून राज्यसभेवर पाठवल्या जाणाऱ्या उमेदवारांच्या नावाबाबत चर्चा झाली. सोमवारी सायंकाळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या निवासस्थानी भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक झाली. भाजपाने ७ जागांसाठी ३५ उमेदवारांचे पॅनल तयार केले असून, त्यात सुधांशू त्रिवेदी यांच्या नावाचाही समावेश आहे तसेच कुमार विश्वास यांचेही नाव यादीमध्ये असल्याची चर्चा आहे, मात्र अद्याप याला दुजोरा मिळालेला नाही.
कुमार विश्वास गाझियाबादमधून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचीही चर्चा उत्तर प्रदेशच्या राजकीय वर्तुळात आहे. आता अशा परिस्थितीत त्यांना राज्यसभेवर पाठवणार की लोकसभेसाठी उमेदवारी करणार, यावर सस्पेन्स कायम आहे. उत्तर प्रदेशमधून राज्यसभेच्या १० जागा रिक्त होत आहेत. त्यापैकी ७ जागा भाजपाच्या खात्यात, तर ३ जागा समाजवादी पक्षाच्या खात्यात जातील.
लवकरच केंद्रीय समितीकडे 35 नावे पाठवली जाणार
मुख्यमंत्री योगी यांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीत दोन्ही उपमुख्यमंत्री केशव प्रसाद शौर्य आणि ब्रिजेश पाठक यांच्या व्यतिरिक्त भूपेंद्र चौधरी आणि संघटनेचे सरचिटणीस धरमपाल सिंह उपस्थित होते. लवकरच केंद्रीय समितीकडे 35 नावे पाठवली जाणार आहेत. त्यापैकी 7 नावांना भाजपा हायकमांडकडून मान्यता दिली जाणार आहे.
हेही पहा –