दिशा सालियान मृत्यू प्रकरणावरून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठीच कुणाल कामरा प्रकरण घडविण्यात आल्याचा आरोप उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (Dr Neelam Gorhe) यांनी केला.
विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात पडसाद
स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा यांच्या समाजमाध्यमावरील एका गाण्यातून नाव न घेता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
यांच्यावर टीका करण्यात आली, असा आरोप विधीमंडळात करण्यात आला. त्याचे पडसाद विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात, विधानसभा आणि विधान परिषद, उमटले. सत्ताधारी आमदारांनी कुणाल कामरा यांना अटक करण्याची मागणी करत
सभागृह डोक्यावर घेतले. विधानसभा एकदा तर विधान परिषद तीन वेळा तहकूब करण्याची वेळ आली. तर अखेर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कामरा यांच्यावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आणि सभागृहाचे कामकाज सुरू झाले.
आदित्य ठाकरे यांचे नाव चर्चेत
याबाबत विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (Dr Neelam Gorhe) ‘हिंदुस्थान पोस्ट’शी बोलताना दिशा सालियन प्रकरणावरून लक्ष विचलित करण्यासाठी कामरा प्रकरण घडविण्यात आले असावे, असा आरोप विरोधकांवर केला. गेले काही दिवस दिशा सालियन मृत्यू प्रकरणात शिवसेना उबाठा आमदार आदित्य ठाकरे यांचे नाव चर्चेत आल्याने त्यावरून लक्ष हटविण्यासाठी कामराने काम केले का? असा सवाल केला जात आहे.
(हेही वाचा Malegaon Blast प्रकरणात कर्नल प्रसाद पुरोहितांना सैन्य अधिकाऱ्यांनी गोवले; abinewz.com चा धक्कादायक खुलासा)
संस्कृती नसून विकृती
मंत्री उदय सामंत यांनीही कामराचा बोलविता धनी कोण? असा सवाल केला. राहुल गांधींसोबत भारत जोडो यात्रेत असलेल्या कुणाल कामरानं केलेलं वक्तव्य हे केवळ एकनाथ शिंदे यांच्याबद्दलच मर्यादित नाही, तर या कामरानं पंतप्रधान आणि सर्वोच्च न्यायालयाबाबतही आक्षेपार्ह शब्द वापरले आहेत, असे उदय सामंत यांनी लक्षात आणून दिले. “अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे म्हणून वाटेल ते बोलावं हे संविधानाला अपेक्षित नाही, ही संस्कृती नसून विकृती आहे, ती ठेचूनच काढायला हवी,” असे सामंत पुढे म्हणाले.
देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा
मुख्यमंत्री फडणवीस कामरा सुपारी घेऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अपमानित करत असेल तर कामरा यांच्यावर कारवाई करावीच लागेल, असा इशारा दिला. कामराला अटक करुन त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी भाजपाचे प्रसाद लाड यांनी यावेळी केली त्याला भाजपा गटनेते प्रवीण दरेकर यांनी समर्थन दिला. (Dr Neelam Gorhe)
Join Our WhatsApp Community