Kunal Kamra पुन्हा ट्रोल! ‘तू आर्टिस्ट कब बना भाई?’

125
Kunal Kamra पुन्हा ट्रोल! 'तू आर्टिस्ट कब बना भाई?'
  • खास प्रतिनिधी 

मुंबई पोलिसांनी कुणाल कामराच्या (Kunal Kamra) कार्यक्रमाला गेलेल्या प्रेक्षकांचे जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरू केल्याने मुंबईत तरी कामरालाचा बाजार उठणार, अशी भीती कामरा (Kunal Kamra) यालाच वाटू लागली असावी. सोमवारी कामराने X वर एक पोस्ट करून ‘कलाकाराला कसे संपवायचे याचे मार्गदर्शन’ या मथाळ्याखाली पाच टप्पे दिले आहेत. त्याला तात्काळ प्रतिक्रिया आली की ‘तू कलाकार नाही तर एक बिकाऊ राजकीय स्टँडअप कॉमेडियन आहेस.’

काँग्रेस से पैसे लीये

एकाने कामराला (Kunal Kamra) प्रश्न केला की, ‘भाई तू आर्टिस्ट कब बना? 2016 टक काँग्रेस के विरुद्ध था. फिर ऊनसे फंड लेके ऊनको टार्गेट करना बंद कर दिया. फिर तू उमर खालीद जैसो को सपोर्ट करने लगा. उसके बाद कंगना पे अटॅक का मजाक बनाया. यह तीर-धनुषवाली शिवसेना के साथ बैठके मजाक उडाया, आज यही तीर-धनुष तेरे पिछवाडे मे आ रही है. तू कलाकार नही है तो एक प्रपोगेंडिस्ट है’, अशा शब्दात कामराला सुनावले.

(हेही वाचा – सनातन हिंदू धर्माबद्दल Mamata Banerjee यांचे वादग्रस्त विधान, म्हणाल्या, ‘एक घाणेरडा धर्म…’)

स्वतःचा आत्मा विकणे

कुणाल कामरा (Kunal Kamra) याने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, कलाकाराला कसे संपवायच यांचे पाच टप्पे. आणि या पोस्टच्या शेवटी कामरा म्हणतो, “आता कलाकारापुढे केवळ दोन पर्याय शिल्लक राहतात. स्वतःचा आत्मा विकणे आणि पैसे घेऊन कठपुतळी बनून राहणे किंवा शांत राहणे.

जसे करावे तसे भरावे

या पोस्टवर एकाने थेट सवाल केला की, या पोस्टचा त्याच्या पैसे घेऊन राजकीय स्टँडअप कॉमेडी संबंध काय? तर दुसऱ्याने कामराला उघडेच पाडले. तुझ्या कारकिर्दीची सुरूवात पंतप्रधान नरेंद्र मोदी शिवीगाळ करून केली. आता तू तेच पैसे दुसऱ्यांकडून घेऊन काम करतो आणि स्वतःला कलाकार म्हणवून घेतो आहेस. जसे करावे तसे भरावे.

(हेही वाचा – Property Tax : मुंबई महापालिकेने मालमत्ता कराचे लक्ष्य काठावर गाठलेच; तब्बल ६१९८ कोटी रुपयांचा कर केला वसूल)

‘कलाकारा’च्या व्याख्येला काळीमा

एका नेटकऱ्याने तर, ‘तू कलाकार नाहीस हे मान्य कर,’ असे म्हणत ‘तू अतिरेक्यांना सहानुभूति दाखवणाऱ्या आणि दिल्लीत दंगल घडवणाऱ्यांच्या यादीत आहेस.” आणखी एकाने तर स्वतःला कलाकार म्हणवून घेणे म्हणजे ‘कलाकारा’च्या व्याख्येला काळीमा फासण्यासारखे आहे, असे म्हटले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.