स्टॅंडअप कॉमेडिअन कुणाल कामराने (Kunal Kamra) एकनाथ शिंदेंवर केलेल्या एका गाण्यामुळे प्रचंड वाद निर्माण झाला. त्याला पोलीस चौकशीसाठी समन्सही पाठवण्यात आलं आहे. आता कुणाल कामराविरोधात राहुल कनालने खार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. राहुल कनालने कामरावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. दहशतवादी संघटना कुणाल कामराच्या यूट्युब चॅनलला पैसे देतात. असा आरोप कनालने केला आहे. (Kunal Kamra)
हेही वाचा-छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्यांवर होणार कारवाई ; Udayanraje Bhosle यांची अमित शहांकडे मोठी मागणी
राहूल कनाल याने पोलिसांकडे कुणाल कामराची चौकशी करण्याची मागणी केली आहे. राहुल कनाल म्हणाले, “कुणाल कामरा प्रधानमंत्री , अर्थमंत्री, गृहमंत्री मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री या सर्व मोठ्या नेत्यांवर बोलतो. ‘हम होंगे कमयाब’ असं देशाचं गाणे आहे त्याला या कामराने ‘हम होंगे कंगाल’ असं बनवलं आहे हे आक्षेपार्ह आहे. कॅनडा, USA, पाकिस्तान मधून 400 डॉलर 300 यूरो पैसे कुणाल कामराला पाठवण्यात आले आहेत. ” (Kunal Kamra)
हेही वाचा- Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढणार; २ कोटी ६३ लाख अर्जांची पडताळणी होणार
“मेहनत करून पैसे कमावणे वेगळं आहे परंतु यांना मिळणारे पैसे हे वेगळी इन्कम आहे ज्याला टीप म्हणतात. एक दिवसापूर्वीच 400 डॉलर त्यांना देण्यात आले आहेत. अशापद्धतीने दहशतवादी संघटनेकडून त्याला पैसे दिले जात आहेत. पत्राची हार्ड कॉपी सॉफ्ट कॉपी मुंबई पोलिसांना दिली आहे. मुंबई पोलिस आता यूट्युब चॅनलला पत्र देत आहेत आणि आमचे वकील सुद्धा त्याला पत्र देणार आहेत. 24 तासात यूट्युबवर कारवाई झालीच पाहिजे. यूट्युबने असे अकाऊंट बंद केले पाहिजेत.” अशी मागणी राहुल कनालने केले आहे. (Kunal Kamra)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community