स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामराने (Kunal Kamra) विडंबन गाण्यावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अवमान केला, त्यामुळे शिवसैनिकांमध्ये प्रचंड संतापाची लाट आहे. त्यांनी हॅबिटेटचा स्टुडिओ तोडला. आता मंत्री शंभूराज देसाई यांनी कुणाल कामराला टायरमध्ये घालून थर्ड डिग्री देऊ, असा इशारा दिला आहे.
कुणाल कामरा (Kunal Kamra) मर्यादेच्या बाहेर गेला आहे. पाणी डोक्यावरून गेले आहे. आम्ही त्याच्या स्टुडिओत जाऊन त्यांनी शिंदेसाहेबांबद्दल काढलेल्या व्हिडिओचा प्रसाद दिला. आता तो मुद्दाम रोज एक नवीन व्हिडिओ रिलीज करत आहे. तो हा प्रकार जाणूनबुजून करत आहे. कामराने (Kunal Kamra) आधी शिंदे साहेबांची बदनामी केली. त्यानंतर केंद्रीय सीतारामन यांची बदनामी केली. तसेच पंतप्रधान मोदींबद्दल चुकीचे शब्द वापरले. सर्वोच्च न्यायालयावरही त्याने चुकीचे विधान केले आहे. आता वेळ आली आहे की आम्ही शिवसैनिकांनी त्याला शिवसेनेच्या भाषेत उत्तर द्यायला हवे. आम्ही मंत्री आहोत पण शिवसैनिक आधी येतात. आमची सहनशीलता आता संपली असून आता आम्ही त्यांना आमच्याच भाषेत उत्तर देऊ, असेही मंत्री देसाई म्हणाले.
(हेही वाचा Bangladeshi Infiltrators घेत होते पीएम-किसान योजनेचा लाभ; १८१ बोगस शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल)
कामराने कुठे भेटायचे ते सांगावे
कामरा (Kunal Kamra) कुठेही असला तरी तो कोणत्याही बिळात लपूदे, त्याला पकडून परत आणून प्रसाद दिला जाईल. कामराला त्याच्या बिळातून बाहेर काढून प्रसाद दिला जाईल. आम्हाला नुकतेच थांबवले आहे, पण कामराने कुठे भेटायचे ते सांगावे. आम्ही शिवसैनिक भेटून प्रसाद देऊ, असेही मंत्री देसाई म्हणाले.
Join Our WhatsApp Community