महाराष्ट्रातील अभुतपूर्व विजयादरम्यान उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) पोटनिवडणुकीचे निकालही समोर आले आहेत. उत्तर प्रदेशातील पोटनिवडणुक ९ पैकी ६ जागांवर भाजपाने (BJP) विजय मिळवला आहे. मात्र यामध्ये कुंडरकी मतदारसंघाची सर्वाधिक चर्चा होती. याचे कारण म्हणजे, ६० टक्के मुस्लिम मतदार असलेल्या जागेवर भाजपाचा हिंदू उमेदवार विजयी झाला आहे. (BJP)
( हेही वाचा : BJP ला सर्वाधिक १,७२,९३,६५० मते; त्या खालोखाल काँग्रेस, शिवसेना, शरद पवार गटाला मिळाली मते)
कुंडरकी विधानसभा जागेवर भाजपाने ३१ वर्ष जुना विक्रम मोडला आहे. भाजपाने ही जागा शेवटी १९९३ मध्ये जिंकली होती. यावेळी भाजपाचे रामवीर सिंह (Ramveer Singh) १ लाख ३१ हजार मतांनी विजय मिळवला. तर समाजवादी पक्षाचे हाजी रिजवान (Haji rizwan) यांना फक्त २० हजार मते मिळाली. (BJP)विशेष म्हणजे, हा मतदारसंघ असलेल्या मुरादाबाद जिल्ह्यात ६० टक्क्यांहून अधिक मुस्लि
म मतदार आहेत आणि हेच मतदार विधानसभा जागा जिंकण्यात महत्त्वाची भुमिका बजावत असतात. तरीही भाजपाचे कुंडरकी विधानसभेचे उमेदवार रामवीर सिंह यांनी विजय मिळवला. त्यातही या जागेवर रामवीर यांच्याव्यतिरिक्त ११ उमेदवार होते. ते सर्व मुस्लिम समाजाचे उमेदवार होते. तरीही मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपाच्या रामवीर सिंहची (Ramveer Singh) जादू पहायला मिळाली. (BJP)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community