MNS : कुर्ल्यात ‘जश्न ए दिवाली’; मनसेच्या दणक्यानंतर बदलला बोर्ड

226

दीपावलीनिमित्ताने ठिकठिकाणी शुभेच्छांचे फलक लावले जातात, रोषणाई केली जाते. त्याप्रमाणे मुंबईतील कुर्ला परिसरातील फिनिक्स मॉलनेही विद्युत रोषणाईच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या; मात्र त्यांना त्या अंगलट आल्या. या ठिकाणी  ‘जश्न ए दिवाली’ (Jashn – E- Diwali) असे लिहिलेला बोर्ड लावला होता, त्याला मनसेने (MNS) विरोध करताच हा बोर्ड बदलण्याची नामुष्की मॉलवर आली.

हिंदू सणाची मुद्दामहून बदनामी करण्याचा प्रयत्न

हिंदू सणाला ‘जश्न-ए-दिवाली’ अशा उर्दूतून शुभेच्छा देत सणाची बदनामी करत असल्याचा आरोप चांदिवली विभागाचे मनसे (MNS) प्रमुख महेंद्र भानुशाली यांनी केला. मनसेच्या विरोधानंतर फिनिक्स मॉलनं ‘जश्न ए’ शब्द काढला. दिवाळीच्या निमित्ताने ‘जश्न-ए-दिवाली’ हा हॅशटॅग मॉलच्या मध्यभागी लावणयात आला. गरज नसताना दिवाळीसारख्या हिंदू सणाला मुस्लिम विचारधारेशी जोडल्याचा आरोप करण्यात आला. त्यावर महेंद्र भानुशाली यांनी जोरदार टीका केली. या संदर्भातील त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियामध्ये व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ते म्हणाले,  हिंदू सणाची मुद्दामहून बदनामी करण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी जश्न ए दिवाळी वापरण्यात आले आहे. दिवाळीच्या शुभेच्छा, दिवाली की शुभकामनाएं, हॅपी दिवाली हे समजू शकतो पण जश्न ए दिवाळी हा काय प्रकार आहे. आम्हाला कोणत्या धर्माचा अपमान करायचा नाही. ज्या पद्धतीने आमच्या सणांसाठी ऊर्दू शब्द वापरला जातो त्याप्रमाणे इतर धर्मांच्या सणांसाठी जय श्रीराम असे हॅश टॅग लिहिले आहे का? असे म्हणत मॉलमध्ये लावण्यात आलेला हॅश टॅग मगे घेण्यात आला आहे.

(हेही वाचा : Air Pollution : पुण्याची हवा मुंबईपेक्षा अधिक प्रदूषित)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.