केंद्रीय गृह मंत्रालयाने लडाख (Ladakh) या केंद्रशासित प्रदेशात 5 नवीन जिल्हे निर्माण करण्याची घोषणा केली आहे. गृह मंत्रालयाने नव्या जिल्ह्यांची यादी जारी केली आहे. झांस्कर, द्रास, शाम, नुब्रा आणि चांगथांग अशी या जिल्ह्यांची नावे आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी X वर एक पोस्ट शेअर करून ही माहिती दिली आहे. काही वर्षांपूर्वी लडाखला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला होता. जम्मू आणि काश्मीरमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने हा मोठा डाव खेळला असल्याचं बोललं जात आहे.
(हेही वाचा –शाळांमध्ये, महिलांकडे आता पॅनिक बटण येणार? Deepak Kesarkar यांची महत्त्वाची माहिती)
यासंदर्भात गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, या जिल्ह्यांची नावे झांस्कर, द्रास, शाम, नुब्रा आणि चांगथांग असतील. गृहमंत्र्यांनी सांगितले की लडाखला (Ladakh) समृद्ध करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी गृह मंत्रालयाने पाच नवीन जिल्हे निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. याच्या मदतीने लडाखच्या (Ladakh) लोकांना उत्तम प्रशासन आणि सेवा पुरवता येतील. लडाखमधील लोकांना संधी देण्यासाठी मोदी सरकार कटिबद्ध आहे. लडाखच्या लोकांच्या हितासाठी ही घोषणा करण्यात आल्याचे शाह म्हणाले.
(हेही वाचा –Mumbai-Goa Highway गणेशोत्सवापूर्वी खड्डे मुक्त होणार; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी दिल्या सूचना)
2019 मध्ये जम्मू-काश्मीरमधून (Jammu and Kashmir) कलम 370 हटवल्यानंतर राज्याचे दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन करण्यात आले. यानंतर लडाख हा वेगळा केंद्रशासित प्रदेश बनला. सध्या लडाखमध्ये फक्त दोन जिल्हे होते. एक कारगिल आणि दुसरे लेह. नव्या जिल्ह्यांमुळे एकूण संख्या सात होईल. 31 ऑक्टोबर 2019 रोजी लडाख हा केंद्रशासित प्रदेश बनला. लडाखमधील कारगिल जिल्हा मुस्लिमबहुल आहे. येथील लोक उपजीविकेसाठी सिंधू नदी आणि शेतीवर अवलंबून आहेत. लडाख ट्रान्स हिले प्रदेशात येतो.
In pursuit of PM Shri @narendramodi Ji’s vision to build a developed and prosperous Ladakh, the MHA has decided to create five new districts in the union territory. The new districts, namely Zanskar, Drass, Sham, Nubra and Changthang, will take the benefits meant for the people…
— Amit Shah (@AmitShah) August 26, 2024
लेह (Leah), लडाखमध्ये (Ladakh) एकच हलाई तळ आहे. त्याचे नाव कुशोक बकुला रिम्पोची विमानतळ आहे. हिवाळ्याच्या काळात लडाखमध्ये प्रचंड बर्फवृष्टी होते. येथे लेह जिल्ह्यातील बौटी आणि कारगिलमध्ये हिंदू, उर्दू, पुरखी आणि इंग्रजी भाषा बोलल्या जातात. बौती ही तिबेटी भाषा आहे. लडाखमधील कमाईचा मुख्य स्त्रोत पर्यटन आहे. झंस्कर जिल्ह्याचे नाव तलावावरून पडले आहे. येथे झंस्कर नावाचा तलाव आहे. उत्तर भारतातील लडाख 2019 पूर्वी जम्मू-काश्मीरचा भाग होता. पण 2019 मध्ये सीमांकन केल्यानंतर, जम्मू-काश्मीरपासून वेगळे केले गेले आणि एक नवीन केंद्रशासित प्रदेश बनविला गेला.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community