Ladki Bahin scheme : लाडक्या बहिणींच्या खात्यात डिसेंबर महिन्याचे पैसे जमा होण्यास सुरूवात

84
Ladki Bahin scheme : लाडक्या बहिणींच्या खात्यात डिसेंबर महिन्याचे पैसे जमा होण्यास सुरूवात
Ladki Bahin scheme : लाडक्या बहिणींच्या खात्यात डिसेंबर महिन्याचे पैसे जमा होण्यास सुरूवात

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा (Ladki Bahin scheme) डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्व महिलांचं लक्ष लागलं होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नागपूर येथे विधानसभेत अधिवेशन संपल्यानंतर लाडक्या बहिणींच्या खात्यात रक्कम वर्ग केली जाईल, असं म्हटलं होतं. त्यानुसार ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’चा (Ladki Bahin Yojana) डिसेंबर महिन्याचा लाभ देण्यास मंगळवारपासून (२४ डिसेंबर) सुरुवात झाली आहे. (Ladki Bahin scheme)

१२ लाखांवर नवे लाभार्थी
एकूण २ कोटी २३ लाख लाभार्थींपैकी ६७ लाख बहिणींना १५०० रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत सर्व महिलांच्या खात्यात रक्कम जमा होईल, असे सांगण्यात आले. विधानसभा निवडणुकीमुळे नोव्हेंबरचे अनुदान ऑक्टोबरमध्ये देण्यात आले होते. आतापर्यंत एकदाही लाभ न मिळालेल्या १२ लाख ८७ हजार बहिणींना सहा महिन्यांचे एकूण नऊ हजार बँक खात्यात जमा करण्यात आले. (Ladki Bahin scheme)

2100 रुपयांसाठी वाट पाहावी लागणार
धानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात महायुतीकडून लाडकी बहीण योजनेची रक्कम 1500 रुपयांवरुन 2100 रुपये करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार 2100 रुपये कधीपासून मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. मात्र, डिसेंबरचा हप्ता 1500 रुपयांप्रमाणं मिळणार आहे. दुसरीकडे, देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपद स्वीकारल्यानंतर अर्थसंकल्पात याबाबत निर्णय घेतला जाईल, असं म्हटलं होतं. त्यानुसार अर्थसंकल्प सादर झाल्यानंतरचं महिलांना 2100 रुपयांचा हप्ता मिळू शकेल, अशी माहिती आहे. (Ladki Bahin scheme)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.