हरियाणाच्या विधानसभा निकालानंतर, महायुतीच्या आशा पल्लवित; Ladki Bahin Scheme तारणार!

136
हरियाणाच्या विधानसभा निकालानंतर, महायुतीच्या आशा पल्लवित; Ladki Bahin Scheme तारणार!
  • खास प्रतिनिधी 

हरियाणा विधानसभेच्या निकालानंतर राज्यातील महायुतीचे मनोबल उंचावले असून जवळपास अडीच कोटी ‘लाडकी बहीण’ (Ladki Bahin Scheme) योजनेच्या लाभार्थी भाजपा-शिवसेना (शिंदे)-राष्ट्रवादी (अजित पवार) महायुतीची ‘नैया’ पार करणार, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

खटाखट, खटाखट, खटाखट

लोकसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी महिलांना लखपती बनवण्याची योजना घोषित केली आणि दर महिन्याला ‘खटाखट, खटाखट, खटाखट’ बँकेत पैसे जमा होतील, असा प्रचार केला. त्यानंतर राज्यातील महायुती सरकारने महाराष्ट्रात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ (Ladki Bahin Scheme) योजना लागू करून दर महिन्याला १,५०० रुपये बँक खात्यात जमा करण्यास सुरुवात केली. सध्या जवळपास २ कोटी २० लाखांवर महिला या योजनेचा लाभ घेत आहेत आणि २० लाखांहून जास्त लाभार्थी अजून वाढण्याची शक्यता आहे.

(हेही वाचा – Hikmat Udhan : जालन्यात ठाकरे गटाला खिंडार, सहसंपर्क प्रमुख हिकमत उढाण करणार शिवसेनेत प्रवेश)

सव्वा कोटी मतदान, निकाल बदलू शकते

या २.४० कोटी लाभार्थी महिलांपैकी अर्ध्या म्हणजेच १.२० कोटी महिलांनी जरी भाजपा नेतृत्वाखालील महायुतीला मतदान केले तरी महायुतीच्या सत्तेचा मार्ग सुकर होईल यात शंका नाही. त्यामुळे महायुतीच्या आशा आता पल्लवित झाल्या असून या योजनेमुळे (Ladki Bahin Scheme) हरियाणाप्रमाणे महाराष्ट्रातही काँग्रेसविरोधी आणि भाजपाच्या बाजूने निवडणूक निकाल लागू शकतो, असा विश्वास युतीच्या नेत्यांमध्ये व्यक्त होत आहे.

(हेही वाचा – Jammu and Kashmir : जंगलात सापडला अपहृत जवानाचा मृतदेह)

महिन्याला ३,७०० कोटी खर्च

‘लाडकी बहीण’ योजनेत अनेक अटी असल्या तरी त्याकडे त्याच्या पूर्ततेकडे सध्या शासकीय पातळीवर फारसे लक्ष दिले जात नाही. तसेच ही योजना आयकर विभागाशी लिंक केली नसल्याने काही लाभार्थी भविष्यात कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. राज्य शासन दर महिन्याला साधारण ३,७०० कोटी रुपये खर्च करत आहे. सरकारने जून २०२४ मध्ये ही योजना (Ladki Bahin Scheme) सुरू केली आणि गेल्या तीन महिन्यांपासून २ कोटी २० लाखांहून अधिक लाभार्थ्यांच्या खात्यात महिन्याला १,५०० रुपये जमा केले जात आहेत. तर आणखी २० लाखांहून अधिक महिला रांगेत आहेत, त्यांचे अर्ज सध्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. तर आता योजनेचा नोव्हेंबरचा १,५०० रुपये हफ्ता एक महिना आधीच खात्यात जमा करण्यास सुरुवात झाली असल्याचे समजते.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.