सावत्र भावांना लाडक्या बहिणींनी जोडा दाखवला; Eknath Shinde यांचा हल्लाबोल

50
लाडक्या बहिणीला नोव्हेंबरचा हफ्ता मिळण्याबाबत सावत्र भाऊ आडकाठी आणणार होते, म्हणून आम्ही त्या महिन्याचा हफ्ता आम्ही ऑक्टोबरलाच दिला.   विकासाला लोकानी महत्व दिले आहे. या निवडणुकीत आम्ही एकत्र येवून काम केले, मतदानाची टक्केवारी वाढली. लाडक्या बहिणीने सावत्र भावांना जोडा दाखवला आहे. लोकांना आरोप प्रत्यारोप, सुडाचे राजकरण नको आहे, त्यांना विकासाचे राजकरण हवे आहे, असा हल्लाबोल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केला.

जनतेला साक्षात दंडवत घालतो

आमची जबाबदारी वाढवणारा निवडणुकीचा हा निकाल आहे. लोकांनी स्वतः ही निवडणूक हातात घेतली. लाडकी बहीण, लाडका भाऊ, शेतकरी आशा सर्वच घटकांनी प्रेम दाखवले. त्यामुळे सर्वांचे धन्यवाद देतो. जनतेला साक्षात दंडवत घालतो. गेल्या दोन वर्षांत आम्ही तिघांनी जे काम केले आणि घटक पक्ष यांनी जे निर्णय घेतले, ते इतिहासातील न भूतो ते भविष्यती असे होते. विकासकामे जी हाती घेतली, त्यामुळे जनतेने ती स्वीकारली. राज्याचा सर्वांगिण विकास हेच ध्येय आम्ही समोर ठेवले. अडीच वर्ष त्यांनी जी विकासकामे बंद पाडली होती, त्याचा परिणाम झाला, आता ती कामे पूर्ण झाली आणि जनतेला त्याचा वापर करता आला, असेही एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले.

लोकांनी सुडाचे, आरोपाचे राजकरण धुडकारले

शेतकरी, महिला, तरुण, या सर्व वर्गासाठी योजना केल्या. कल्याणकारी योजना आणि विकास याची सांगड घातली. या राज्याला पुढे घेऊन जायचे, हेच ध्येय ठेवले. दोन अडीच वर्षांत आम्हाला केंद्रानेही बरीच मदत केली. लाडकी बहीण योजना, शासन आपल्या दारी यामुळे हे सरकार देणारे आहे केवळ बोलणारे नाही, असा विश्वास जनतेला वाटत होता. या निवडणुकीत लोकांनी सुडाचे, आरोपाचे राजकरण धुडकारले. लोकसभेच्या वेळी खूप फेक नेरेटीव्ह केले, पण तरीही पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी बसले, आताही आम्हाला जनतेने कौल दिला आहे. आमचे सरकार आल्यावर ‘हे सरकार पडणार म्हणून वारंवार म्हणत राहीले, तरीही मी आणि आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री हे खूप काम करत राहिलो, घरी बसून निवडणूक जिंकता येत नाही. शिवसेना कुणाची हेही लोकांनी ठरवले आहे, असेही शिंदे (Eknath Shinde) म्हणाले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.