यंदाच्या अर्थसंकल्पात ‘मु्ख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ (Ladki Bahin), ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना’, युवकांना अनुदान, विद्यार्थिनींना पदवीपर्यंतचे शिक्षण मोफत, दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांतील महिलांना वर्षाला तीन सिलिंडर मोफत अशा विविध घोषणा करण्यात आल्या होत्या. या योजना सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी व त्यांची जास्तीत जास्त प्रसिद्धी करण्यासाठी प्रसिद्धी माध्यम आराखडा राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी सरकारने २०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे.(Ladki Bahin)
अशाप्रकारे करणार प्रसिद्धी…
लाडकी बहीण योजनेच्या प्रसिद्धीसाठी नमूद माध्यम आराखड्यानुसार जाहिरात प्रसिध्दीची कार्यवाही माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाने महिला व बाल विकास विभागाच्या यंत्रणेच्या समन्वयानं करायची आहे. लाडकी बहीण योजनेच्या प्रसिद्धीसाठी माहितीपट, अॅनिमेशन फिल्म, व्हिडिओ थीम साँग, ऑडिओ साँग, जिंगल्स, स्पॉट तयार करण्यात येणार आहेत. (Ladki Bahin)
ओटीटी माध्यमांवर देखील जाहिरात
या सर्वांची प्रसिद्धी वर्तमानपत्रे, दूरदर्शन, आकाशवाणी केंद्र, वाहिन्या, एफएम रेडिओ,कम्युनिटी रेडिओ, स्थानिक लोकल केबल सिनेमागृह, मुंबई लोकल, एसटी बसेस, आणि रेल्वे स्थानकांवर देखील केली जाणार आहे. चर्चासत्रांचं आयोजन दखील केलं जाणार आहे. बेस्ट बसेस, एसटी डेपोतील स्क्रीन, पीएमपी, सोशल मिडिया आणि डिजीटल मिडिया, ओटीटी माध्यमांवर देखील जाहिरात केली जाणार आहे. (Ladki Bahin)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community