राज्यभरातील लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण (Mukhyamantri Ladki Bahin Yojana) योजनेंतर्गत मिळणाऱ्या लाभाची रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग करण्यास सुरुवात केली आहे. या अंतर्गत शुक्रवारपर्यंत 1 कोटी 10 लाख लाभार्थी महिलांच्या खात्यात सन्मान निधी जमा झाला आहे. शनिवार आणि रविवारी उर्वरित महिलांना या निधीचा लाभ होईल. तसेच योजनेच्या जानेवारीच्या हप्त्याचे 1500 रुपये मिळण्यास सुरुवात झाली आहे. राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनीच यासंदर्भात माहिती ‘एक्स’च्या माध्यमातून दिली. (Ladki Bahin Yojana)
वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांच्या आतमध्ये असलेल्या कुटुंबातील महिलांना आर्थिक मदत मिळावी या हेतून महायुती सरकारने (Mahayuti Govt) मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. जुलै महिन्यात घोषणा करण्यात आल्यानंतर राज्यातील 21 ते 65 वयोगटातील सुमारे दोन कोटी महिलांना आत्तापर्यंत दरमहा 1500 रुपये देण्यात आले. जुलै ते डिसेंबर असे 9 हजार रुपये महिलांच्या खात्यात जमा झाले.
(हेही वाचा – ICC ODI Team of the Year : आयसीसीच्या एकदिवसीय संघात एकही भारतीय नाही)
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
जानेवारी २०२५ महिन्याचा सन्मान निधी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. २४ जानेवारी २०२५ पर्यंत १.१० कोटी लाभार्थी महिलांच्या खात्यात सन्मान निधी जमा झाला असून, २६ जानेवारी पर्यंत सर्व पात्र महिलांच्या खात्यात सन्मान निधी… pic.twitter.com/fU5dIUr8xe
— Aditi S Tatkare (@iAditiTatkare) January 24, 2025
(हेही वाचा – ICC ODI Team of the Year : आयसीसीच्या एकदिवसीय संघात एकही भारतीय नाही)
जानेवारी 2025 महिन्याचा सन्मान निधी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. 24 जानेवारी 2025 पर्यंत 1.10 कोटी लाभार्थी महिलांच्या खात्यात सन्मान निधी जमा झाला असून, 26 जानेवारी पर्यंत सर्व पात्र महिलांच्या खात्यात सन्मान निधी जमा होणार आहे,असे ट्विट अदिती तटकरे यांनी केलं आहे. त्यामुळे आता सातव्या महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होण्यास सुरूवात झाली आहे. पहिल्या दिवशी 1 कोटी 10 लाख लाभार्थी महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचा निधि जमा झाल्याचे त्यांनी नमूद केलं. 26 जानेवारीपर्यंत सर्व पात्र महिलांच्या खात्यात जमा होईल, असेही त्यांनी नमूद केलं. राज्यभराती सुमारे अडीच कोटी महिलांनी या योजेनचा लाभ घेतला आहे. तर जानेवारीचा हप्ताही आता जमा होत असून सात महिन्यांचे मिळून एकूण 10 हजार 500 रुपये पात्र महिलांना मिळतील.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community