Ladki Bahin Yojana: शेकडो बहिणींनी अर्ज घेतले मागे, आदिती तटकरे यांच्याकडून मोठा खुलासा

307

महायुती (Mahayuti) सरकारने लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली. या योजनेचा लाभ राज्यातील सव्वा दोन कोटी महिलांना झाला. विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरली. महायुतीला दणदणीत विजय मिळाला. त्यानंतर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांनी सगळे निकष पूर्ण केले आहेत का, याची काटेकोर पडताळणी होणार असल्याची माहिती पुढे आली. तेव्हापासून लाभार्थ्यांच्या मनात धाकधूक सुरु आहे. (Ladki Bahin Yojana)

आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना अनेक गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. आम्ही परिवहन विभाग आणि आयकर विभागासोबत मिळून अर्जांचं क्रॉस व्हेरिफिकेशन करत आहे, असं आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी सांगितलं. महिला किंवा त्यांच्या नवऱ्याच्या नावावर वाहन तर नाही ना? यासाठी सरकार परिवहन विभागांकडून क्रॉस व्हेरिफिकेशन करत आहे. तर कोणत्या महिला किंवा त्यांचे पती कर भरतात? त्यांचं उत्पन्न काय याची माहिती मिळवण्यासाठी आयकर विभागाच्या मार्फत क्रॉस व्हेरिफिकेशन केलं जात आहे.

(हेही वाचा – Sharad Pawar यांच्या गटातील ‘हा’ आमदार साथ सोडून अजित पवारांच्या गटात प्रवेश करणार, शिर्डीमध्ये प्रवेश सोहळा निश्चित)

एकूण अडीच कोटी महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला आहे. या सर्वांच्या अर्जांची छाननी होणार नाही. ज्यांनी पिवळे आणि केशरी रेशन कार्ड जोडले आहेत, त्यांच्या अर्जाचं क्रॉस व्हेरिफिकेशन होणार नाही. पिवळे आणि केशरी रेशनकार्ड असलेल्या महिला दारिद्रय रेषेखाली येतात. त्यांचं उत्पन्न एक लाखाच्या आत आहे. शिवाय अन्न आणि नागरी पुरवठा विभाग या लोकांचं व्हेरिफिकेशन करूनच त्यांना रेशन कार्ड देत असतो. त्यामुळे त्यांचं आधीच क्रॉस व्हेरिफिकेशन (ladki Bahin scheme verification) झाल्याचं गृहित धरून आम्ही पिवळ्या आणि केशरी रेशनकार्ड असलेल्या महिलांच्या अर्जाची छाननी करणार नाही, अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली.

राज्यातील एकूण ४ हजार महिलांनी त्यांचे अर्ज मागे घेतले आहेत. यात छत्रपती संभाजीनगर आघाडीवर आहे. अपात्र ठरण्याची टांगती तलवार असल्यानं या महिलांनी स्वत:हूनच अर्ज मागे घेतले आहेत. विधानसभा निवडणुकी (Assembly Elections) आधी २ कोटी ६३ लाख महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केले होते. त्यातील २ कोटी ३४ लाख महिलांचे अर्ज मंजूर झाले. पण आता त्या पात्र अर्जांची छाननी होण्याची भीती अनेक महिलांना वाटू लागली आहे.

(हेही वाचा – SSC & HSC Board Exam 2025 : दाहवी- बारावीच्या हॉल तिकिटावर जातीचा उल्लेख; शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह)

मंत्री अदिती तटकरेंकडून महत्त्वाची अपडेट

महिला आणि बालकल्याण विभागाच्या मंत्री अदिती तटकरेंनी लाडकी बहीण योजनेबद्दल महत्त्वाची अपडेट दिली आहे. ‘योजनेच्या माध्यमातून देण्यात आलेले पैसे परत घेण्याचा आमचा विचार नाही. चुकीच्या पद्धतीनं अर्ज भरलेल्या महिलांनी त्यांचे अर्ज मागे घेतले आहेत. चुकीच्या पद्धतीनं अर्ज भरणाऱ्या महिला अपात्र ठरतील. त्यांना पुढील हफ्ते मिळणार नाहीत. अन्य लाभार्थ्यांना जानेवारीच्या अखेरीस पुढील हफ्ता मिळेल,’ अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.