लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता दिला आहे. विधानसभा निवडणुकीनंतर (Assembly elections) २१०० रुपये दिले जातील, असं सांगितलं जात होतं. त्यामुळे डिसेंबर महिन्यातच २१०० रुपये मिळतील, असं लाडक्या बहिणींना वाटत होतं. मात्र, अजूनही या वाढीव निधीबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे डिसेंबर महिन्यात महिलांना १५०० रुपये देण्यात आले होते. (Ladki Bahin Yojana)
हेही वाचा-स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी BJP सज्ज, ‘महाविजेता’ अभियानास उद्यापासून सुरुवात
अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर (Budget session) महिलांना २१०० रुपये हप्ता दिला जाईल, अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली होती. त्यामुळे महिलांना या महिन्यातदेखील १५०० रुपये मिळणार आहे. लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिला इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेत नसाव्यात. जर महिला पीएम किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत असतील तर त्यांना फक्त एकाच योजनेचा लाभ घेता येणार आहे. (Ladki Bahin Yojana)
दरम्यान, आता महिलांना २१०० रुपये मिळणार का, याबाबत महिलांच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे. महिलांना जानेवारी महिन्यात १५०० रुपये मिळणार की २१०० रुपये याकडे सर्वांचेच लक्ष आहे. महिलांना या महिन्यातदेखील १५०० रुपये मिळणार आहेत. (Ladki Bahin Yojana)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community