मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना अनेक विषयांवर भाष्य केलं. यावेळी बोलताना फडणवीस यांना लाडकी बहीणमुळे विकासाची गती कमी झाली आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) म्हणाले, “यावर या योजनेला वेगळ्या नजरेने बघायला हवं. या योजनेमुळे महिलांना प्रतिष्ठा मिळाली. महिलांनी हे 1500 रुपये जमा करुन स्मॉल क्रेडीट सोसायटी सुरु केली. 30 लाख रुपये जमा करुन कर्ज देणं सुरु केलं. हे आम्ही राज्यभर करणार आहोत.”
हेही वाचा-Sambhal News : राहुल गांधींना संभल न्यायालयाची नोटीस; ४ एप्रिलला उपस्थित रहाण्याचे आदेश
“बचत गटांची मदत घेऊ. गेल्या दिड वर्षात 24 लाख लखपती दिदी आम्ही तयार केल्या. यंदा 26 लाखांचे टार्गेट आहे. 40-45 हजार कोटी लोक अशा पद्धत्तीच्या सामाजिक सेवांमध्ये टाकतो. तेव्हा पायाभूत सेवांमधील गुंतवणुकीवर काही बंधनं येतात. आम्ही तिघांनी जेव्हा प्लॅनिंग केलं. आपण आपलं फिस्कल डेफीशीट 3 टक्क्यांच्या आत ठेवलं आहे.” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. (CM Devendra Fadnavis)
दिशा सालियन प्रकरणावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “दिशा सालियन प्रकरणाची ही चर्चा सुरु झाली, ती कोर्टातील केसमुळे सुरु झाली. तिच्या वडिलांनी पण मुलाखत दिली आहे. कोर्ट काय म्हणतय…कोर्टात ते काय पुरावे देतात. याच्या आधारावर शासनाची भुमिका ठरेल. कोर्ट ज्या प्रकारे आम्हाला आदेश देईल किंवा तेव्हा काही नवीन गोष्टी आल्या तर त्यानूसार सरकार निर्णय घेईल.” असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितले. (CM Devendra Fadnavis)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community