खारघरमध्ये इज्तेमासाठी जमले होते लाखो तबलिगी Muslim; सोशल मीडियात नेटकऱ्यांनी व्यक्त केली चिंता

रात्री जेव्हा हा मेळावा संपला तेव्हा एकाच वेळी हा लाखोंचा लोंढा खारघर रेल्वे स्थानकावर येऊन धडकला.

168

मुंबईने पुन्हा एकदा धर्माच्या नावाखाली लाखोंच्या संख्येने जमलेल्या मुसलमानांची (Muslim) गर्दी पाहिली. ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी या दिवसांत खारघर येथे तबलिगी जमातच्या इज्तेमा अर्थात धार्मिक मेळाव्याचे आयोजन केले होते. शेवटच्या दिवशी म्हणजे रविवार, २ फेब्रुवारीला या ठिकाणी सुमारे ८ ते ९ लाख मुसलमान जमले होते. रात्री १० वाजता हा लोंढा जेव्हा खारघर रेल्वे स्थानकात आला तेव्हा या झुंडीचे व्हिडीओ सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. त्यावेळी अनेक नेटकऱ्यांनी चिंता व्यक्त केली.

तबलिगी मुसलमानांचा  (Muslim) इज्तेमा हा एक मोठा मेळावा असतो. तबलिगी जमात ही सुन्नी इस्लाम धर्माचा प्रचार करणारी संघटना आहे. अलिकडेच, मुंबईतील आझाद मैदानात अहले सुन्नत वाल जमातने इज्तेमाचे आयोजन केले होते. जिथे लाखो मुसलमानांचा जमाव जमला होता. खारघरमध्ये ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान तबलिगी जमात इज्तेमा झाला. या ठिकाणी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मुसलमान या मेळाव्यासाठी जमले होते. रात्री जेव्हा हा मेळावा संपला तेव्हा एकाच वेळी हा लाखोंचा लोंढा खारघर रेल्वे स्थानकावर येऊन धडकला. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलकडे जाणाऱ्या प्रत्येक लोकलवर ही झुंड तुटून पडायची. सगळा जथ्या लोकलमध्ये घुसण्याचा प्रयत्न करायचा, त्यामुळे अनेक प्रवाशांना खारघरच्या पुढील स्थानकांवर उतरणे अशक्यच बनले. यातील किती जणांनी रितसर तिकीट काढून प्रवास केला असावा का, याविषयी नेहमी प्रवास करणारे प्रवासी शंका व्यक्त करत होते. आरडाओरडा करत ही झुंड (Muslim) येणारी प्रत्येक लोकलवर जणू झडप घालत होती.

(हेही वाचा देशभरात ‘Bangladeshi घुसखोर हाकला, देश वाचवा’ ही मोहीम राबवणार; हिंदू जनजागृती समितीची घोषणा)

काय म्हणतात नेटकरी? 

विशेष म्हणजे हार्बर लाईनवर पनवेल येथून सीएसएमटीकडे जाण्यासाठी शेवटची लोकल ११.५३ वाजताची आहे. त्यानंतर लोकल बंद होतात. गणेशोत्सवानंतर हजारो गणेशभक्त जेव्हा कोकणातून येताना रात्री उशिरा पनवेल रेल्वे स्थानकात उतरतात, तेव्हा लोकल बंद झाल्याने ते रात्रीभर कुटुंबकबिला घेऊन पनवेल रेल्वे स्थानकावर झोपतात, पण रेल्वे कधी विशेष लोकल सोडत नाही, पण २ फेब्रुवारीला ११.५३ वाजल्यानंतरही मध्यरात्री दीड वाजेपर्यंत विशेष लोकल सोडण्यात येत होत्या. या सगळ्या प्रकारचे व्हिडीओ जेव्हा सोशल मीडियात व्हायरल झाले तेव्हा अनेक नेटकऱ्यांनी चिंता व्यक्त केली, काहींनी ‘ही हिंदूंमध्ये भय निर्माण करण्यासाठीची गर्दी आहे’, अशी प्रतिक्रिया दिली. तर काही ‘हा धर्मांध उन्माद आहे’, असे म्हणाले. अशा प्रकारे अनेक नेटकऱ्यांनी या माध्यमातून सावधानतेचा इशारा दिला. (Muslim)

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.