राष्ट्रवादीला मोठा धक्का: ‘या’ खासदाराला १० वर्षांची शिक्षा

98

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर सध्या संकटाचं सावट आल्याचं दिसत आहे. कारण महाराष्ट्रातील राष्ट्रवादीच्या नेत्यांवर ईडीचं सावट घोंघावत आहेत. यादरम्यानच राष्ट्रवादी काँग्रेसचे लक्षद्वीपमधील एका खासदाराला १० वर्षांची शिक्षा ठोठवण्यात आली आहे. जीवघेण्या हल्ला प्रकरणात केरळमधील जिल्हा सत्र न्यायालयाने राष्ट्रवादीचे खासदार मोहम्मद फैजल यांना दोषी ठरवून १० वर्षांची शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसची लोकसभेतील एक जागा कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान राष्ट्रवादीचे लोकसभेत एकूण ५ खासदार आहेत. महाराष्ट्रातले ४ आणि लक्षद्वीपमधले मोहम्मद फैजल आहेत. शिवाय राज्यसभेत राष्ट्रवादीचे ४ खासदार आहेत. पण दोन दिवसांपूर्वी २००९च्या राजकीय खटल्यात ज्यामध्ये जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न केला होता, या प्रकरणात केरळच्या जिल्हा सत्र न्यायालयाने मोहम्मद फैजल यांना दोषी ठरवलं आहे. न्यायालयने फैजल यांच्यासह एकूण ४ जणांना दोषी ठरवलं आहे.

२०१३मधलं लीली थॉमस प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या जजमेंटनुसार, कुठल्याही लोकप्रतिनिधीला दोन वर्षांपेक्षा जास्त शिक्षा झाली तर तो तात्काळ निलंबित होतो. यापूर्वी दोषी लोकप्रतिनिधीला दाद मागण्यासाठी वेळ दिला जायचा. पण २०१३च्या या जजमेंटनंतर हा बदल झालेला आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादीचे खासदार मोहम्मद फैजल यांच्यावर निलंबनाची टांगती तलवार आहे. तसेच राष्ट्रवादीची लोकसभेतील एक जागाही कमी होण्याची शक्यता आहे.

(हेही वाचा – नुपूर शर्मा यांना बंदूक बाळगण्याचा परवाना; दिल्ली पोलिसांची माहिती)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.