दिल्लीत (Delhi) जेडीयूच्या (JDU) राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ललन सिंह (Lalan Singh) यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. लोकसभा निवडणुकीतील (Lok Sabha Election) सक्रियता पाहता मी हा निर्णय घेतल्याचे ते म्हणाले. (JDU)
आता नितीशकुमार (Nitish Kumar) जनता दल युनायटेडचे (JDU) नवे अध्यक्ष बनणार हे निश्चित आहे. त्याची औपचारिक घोषणा अजून व्हायची आहे. दुपारी चार वाजता होणाऱ्या राष्ट्रीय परिषदेच्या बैठकीत नितीश यांच्या नावाची घोषणा होऊ शकते. नितीशकुमार (Nitish Kumar) यांच्या हातात पक्षाची कमान येण्याची ही दुसरी वेळ असेल. (JDU)
(हेही वाचा – Marathwada: जालना-मुंबई वंदे भारत ट्रेन सुरू होणार, जाणून घ्या तिकिटाचे दर)
जेडीयूचे (JDU) राष्ट्रीय सरचिटणीस दासाई चौधरी यांनी सांगितले की, कार्यकारिणीच्या बैठकीत विजेंद्र यादव यांनी पक्षाध्यक्षपदासाठी नितीशकुमार (Nitish Kumar) यांचे नाव पुढे केले. प्रमुख चेहरा असल्याने त्यांनी २०२४च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी (Lok Sabha Election) संघटनेची धुरा सांभाळावी, असे पक्षातील बहुतांश प्रमुख नेत्यांचे मत होते. ज्याला कार्यकारिणीच्या बैठकीत उपस्थित सर्व नेत्यांनी पाठिंबा दिला. (JDU)
यानंतर नितीश (Nitish Kumar) म्हणाले की, तुम्ही जेव्हा जेव्हा विनंती कराल तेव्हा मी त्यासाठी तयार आहे. ललन सिंह (Lalan Singh) यांनीही पाठिंबा दिला. ते म्हणाले- मी बराच काळ पक्षाध्यक्ष आहे. मला निवडणूक लढवायची आहे आणि पक्षात इतर कामे करायची आहेत. २१ जुलै २०२१ रोजी ललन सिंह (Lalan Singh) यांना जद युचे राष्ट्रीय अध्यक्ष बनवण्यात आले. राष्ट्रीय अध्यक्षांचा कार्यकाळ २ वर्षांचा असतो. ललन सिंह यांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. (JDU)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community