संसदेच्या सुरक्षेतील हलगर्जीपणा उघडकीस आल्यानंतर पोलिसांच्या चौकशीत आता अनेक धक्कादायक बाबी पुढे येत आहेत. या घटनेचा मास्टरमाईंड ललित झा (Lalit Jha) याने पोलिसांना उलट तपासणीत अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. संसदेत शिरण्याची योजना अयशस्वी झाली असती तर गुन्हेगारांकडे बॅकअप प्लॅन अर्थात प्लॅन बी तयार होता, असे झा (Lalit Jha) याने पोलिसांना सांगितले असल्याचे समजते. (Lok Sabha Intrusion)
दिल्ली पोलिसातील सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, नीलम आणि अमोल यांनी संसदेबाहेर धूर सोडणे हा या योजनेचाच एक भाग होता, असे ललित झा (Lalit Jha) याने पोलिसांना सांगितले आहे. किंबहुना, नीलम आणि अमोल काही कारणांमुळे संसद भवनाजवळ पोहोचू शकले नसते तर याचा दुसरा प्लॅन सुध्दा तयार होता. प्लॅन बी नुसार, नीलम आणि अमोल अपयशी झाले असते तर महेश आणि कैलाश दुसऱ्या बाजूने संसदेजवळ पोहोचले असते आणि त्यांनी कॅनमधून धूर सोडला असता. यासर्व गोष्टी मिडीयाचे लक्ष वेधून घेण्यासाठी करण्यात आल्या होत्या, असेही सांगण्यात येत आहे. (Lok Sabha Intrusion)
ललित झा चालवायचा नि:शुल्क कोचिंग सेंटर
दरम्यान, ललित झा (Lalit Jha) ज्या एनजीओशी संबधित आहे त्या एनजीओचा नक्षलवाद्यांशी काही संबंध आहे का? याचा तपास पश्चिम बंगाल पोलिसांनी करायला सुरुवात केली आहे. पश्चिम बंगालच्या पुरुलिया जिल्ह्यातील टुनटुरी येथे ललित झा (Lalit Jha) ‘साम्यवादी सुभाष सभा’ नावाच्या संस्थेच्या माध्यमातून नि:शुल्क कोचिंग सेंटर चालवित आहे. हे क्षेत्र म्हणजे नक्षलवाद्यांचा बालेकिल्ला होय. यामुळे झा (Lalit Jha) याचे नक्षलवाद्यांशी काही संबध आहेत काय? याचा तपास केला जात आहे. (Lok Sabha Intrusion)
(हेही वाचा – Maharashtra Legislative Council: ठाकरेंनी फक्त आश्वासन दिलं, पण फडवीसांनी करून दाखवलं; अण्णा हजारे यांची टीका)
ललित आणि महेश यांनी केले आत्मसमर्पण
महत्वाचे म्हणजे, संसदेच्या सभागृहात उडी मारण्याची घटना घडली तेव्हा या संपूर्ण प्रकरणाचा मुख्य सूत्रधार ललित झा (Lalit Jha) हा देखील महेश आणि कैलाससोबत संसदेबाहेर उपस्थित होता. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे. ललित आणि महेश यांनी गुरुवारी कर्तव्यपथ पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केले होते. या दोघांची दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलकडून चौकशी सुरू आहे. झा (Lalit Jha) याला अटक करण्यात आली असून महेशला चौकशीसाठी कोठडीत ठेवण्यात आले आहे. (Lok Sabha Intrusion)
मास्टरमाइंड ललित झा राजस्थानला पळून गेला होता
या घटनेनंतर मूळ बिहारचा रहिवासी असलेल्या ललित झा (Lalit Jha) याने दिल्लीतून पळ काढल्यानंतर राजस्थानमध्ये आश्रय घेतला होता. राजस्थानमधील एका हॉटेलमध्ये त्यांनी महेशसोबत एक दिवस घालवला. या घटनेत केवळ सहा ते सात जणांचा सहभाग होता की अतिरिक्त साथीदारांनीही यात मदत केली, याचाही विशेष सेल तपास करत असल्याचे सूत्राने सांगितले. (Lok Sabha Intrusion)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community